OpenAI ने खरेदी केला नवीन डोमेन! 126 करोड रुपयांना फायनल झाली डील, काय आहे खासियत? जाणून घ्या सविस्तर
काही दिवसांपूर्वी JioHotstar डोमेनबाबत इंटरनेटवर बरीच चर्चा झाली होती. डोमेचा खरा मालक कोण, याबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. ॲप डेव्हलपरने रिलायन्सला पत्र लिहीत डोमेन विक्रीसाठी पैशांची मागणी केली होती. त्यानंतर एका भावा- बहिणीने या डोमेनचा मालक असल्याचा दावा केला होता. JioHotstar डोमेनची सोशल मिडीयावर चर्चा सुरु असतानाच आता चॅटजीपीटी तयार करणाऱ्या कंपनी OpenAI ने नवीन डोमेन खरेदी केलं आहे. 126 कोटी रुपयांना हा व्यवहार पूर्ण झाला असून OpenAI ने खरेदी केलेल्या या डोमेनची सध्या चर्चा सुरु आहे.
हेदेखील वाचा- मोबाईल युजर्स इकडे लक्ष द्या! फ्रॉडर्सने शोधला फसवणुकीचा नवीन मार्ग, TRAI ने जारी केली वॉर्निंग
हे डोमेन विकणारी व्यक्ती भारतीय वंशाची धर्मेश शाह आहे. धर्मेश शाह HubSpot चे सह-संस्थापक आणि CTO देखील आहे. या डोमेनमध्ये असे काय आहे ज्यासाठी OpenAI ने करोडो रुपये देण्याचे मान्य केले, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
भारतीय वंशाच्या धर्मेश शाह यांनी स्वतः chat.com डोमेनबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या मते, हे डोमेन विकत घेण्यासाठी OpenAI ने 15 मिलीयन यूएस डॉलर्स म्हणजेच 126 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम भरली आहे.
अनेकांच्या मनात एक प्रश्न आहे की, या डोमेनमध्ये एवढे विशेष काय आहे की त्यासाठी धर्मेश शाह यांना OpenAI ने करोडो रुपये दिले. याची अनेक कारणे आहेत. पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे chat.com डोमेन फार जुनं आहे, त्यामुळे त्याची विश्वासार्हता गुगलच्या नजरेत कायम आहे. या डोमेनची नोंदणी 1996 मध्ये झाली. म्हणजे डोमेन सुमारे 28 वर्षांचे आहे. दुसरे म्हणजे, त्याचे साधे नाव त्याला खास बनवते. साधे, जुने आणि लक्षात ठेवण्यास सोपे डोमेन सहसा जास्त किंमत देतात.
शहा यांनी त्यांच्या एक्स हँडलवर या डोमेनच्या विक्रीची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, chat.com हे एक उत्तम डोमेन आहे आणि ते प्रोडक्ट यशस्वी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हा करार 15 मिलियन अमेरिकी डॉलरमध्ये पूर्ण झाला आहे. हे डोमेन खरेदी करण्यामागील OpenAI चा उद्देश त्याच्या सेवा जास्तीत जास्त लोकांना सहज उपलब्ध करून देणे हा आहे. कंपनीला तिच्या सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत उपलब्ध व्हाव्यात असे वाटते. या करारावर बराच काळ बोलणी सुरू होती आणि आता हा करार फायनल झाला आहे.
BREAKING NEWS: Secret acquirer of $15+ million domain chat .com revealed and it’s exactly who you’d think.
For those of you that have been following me for a while, you may recall that I announced earlier this year that I had acquired the domain chat .com for an “8 figure sum”… https://t.co/nv1IyddP5z
— dharmesh (@dharmesh) November 6, 2024
हेदेखील वाचा- Jio Recharge Plans: जिओचे दोन जबरदस्त रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरंच काही
Chat.com हे एक अतिशय लहान नाव आहे आणि ते लक्षात ठेवण्यास सोपे आहे. या प्रकारच्या डोमेनला “व्हॅनिटी डोमेन” म्हणतात. आजकाल व्हॅनिटी डोमेनची लोकप्रियता खूप वाढत आहे. व्हॅनिटी डोमेन एखादी व्यक्ती किंवा ब्रँडच्या नावाने ओळखले जाते. हे एक सानुकूल डोमेन नाव आहे जे लक्षात ठेवणे सोपे आहे. या प्रकारच्या डोमेनना कस्टम URL किंवा ब्रँडेड URL देखील म्हणतात.