बजेट सेगमेंटमध्ये लाँच झला Redmi चा लेटेस्ट स्मार्टफोन, मोठ्या बॅटरीसोबत मिळणार दमदार फीचर्स
स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन आज 6 जानेवारी 2025 रोजी लाँच केला आहे. Redmi 14C 5G या नावाने हा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. नवीन वर्षात कंपनीने भारतात हा पहिला स्मार्टफोन लाँच केला आहे. नवीन Redmi 14C 5G स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या स्मार्टफोनची चर्चा सुरु होती, तो फोन अखेर आता भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. मोठी बॅटरी आणि दमदार फीचर्सने हा नवीन स्मार्टफोन सुसज्ज आहे.
आता WhatsApp चॅटिंगमध्ये मिळणार अॅनिमेशनची मजा, लवकरच येणार नवीन वर्षाचं पहिलं अपडेट
Redmi 14C 5G स्मार्टफोन क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 SoC प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6 GB रॅमचा सपोर्ट देण्यात आला आहे. नवीन बजेट स्मार्टफोन तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Redmi ने एक्सवर पोस्ट करत या स्मार्टफोनचे फीचर्स शेअर केले आहेत. या नवीन स्मार्टफोनमध्ये कोणते स्पेसिफिकेशन दिलेले आहेत आणि सेल कधीपासून सुरु होणार आहे, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
Xiaomi चा नवीनतम Redmi 14C 5G स्मार्टफोन तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB + 64GB, 4GB + 128GB आणि 6GB + 128GB यांचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये आहे. तर स्मार्टफोनचा 4GB + 128GB व्हेरिअंट 10,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. तर या स्मार्टफोनचा टॉप व्हेरिअंट 6GB + 128GB हा 11,999 रुपयांना उपलब्ध आहे. कंपनीने हा स्मार्टफोन स्टारलाईट ब्लू, स्टारगेज ब्लॅक आणि स्टारडस्ट पर्पल रंगांमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनची पहिली विक्री 10 जानेवारीपासून Amazon, Flipkart, Mi.com आणि Xiaomi रिटेल स्टोअर्सवर लाईव्ह होणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला 10 जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
डिस्प्ले – Redmi 14C 5G फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा 6.88 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 600 nits उच्च ब्राइटनेस, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि TUV सर्टिफिकेशनने सुसज्ज आहे.
प्रोसेसर- या नवीन स्मार्टफोनमध्ये परफॉर्मन्ससाठी क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 4 जनरल 2 प्रोसेसर आहे. जे 128 GB पर्यंत स्टोरेजसह जोडलेले आहे.
कॅमेरा- स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर 50MP मुख्य आणि 2MP दुय्यम कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8MP कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी आणि चार्जिंग- यात 5,160mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनसोबत 18W चा चार्जर उपलब्ध आहे.
OS- यात Android 14 ऑपरेटिंग सिस्टम आहे.
इतर वैशिष्ट्ये- फोनला पाणी आणि धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी IP52 रेटिंग मिळाले आहे. यात 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप सी पोर्ट आहे.
Redmi 14C 5G स्मार्टफोन Redmi 13C चा उत्तराधिकारी म्हणून लाँच करण्यात आला आहे. नवीनतम फोनमध्ये वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. ज्यामध्ये चार सेन्सर दिसत आहेत. पण प्रत्यक्षात 2 सेन्सर आहेत. यात एलईडी फ्लॅश आहे. यात आधीच्या मॉडेलपेक्षा मोठा डिस्प्ले आहे. यासोबतच रिफ्रेशचा दरही वाढला आहे.