Apple ने थांबवलं या गॅझेटचं प्रोडक्शन! काय आहे कारण, जाणून घ्या सविस्तर
टेक जायंट कंपनी अॅपलने त्यांच्या एका गॅझेटचं प्रोडक्शन आता बंद केलं आहे. Apple Vision Pro या हेडसेटची मागणी कमी झाल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी एक अहवाल सादर करण्यात आला होता, ज्यामध्ये सांगण्यात आलं होतं की कंपनी Apple Vision Pro चे प्रोडक्शन कमी करण्याचा निर्णय घेत आहे. मात्र 2024 च्या अखेरीस सर्वांना धक्का देत कंपनीने Apple Vision Pro चे प्रोडक्शन पूर्णपणे बंद केलं आहे.
क्रशची Instagram Story पाहायची? तेही तिला कळू न देता! ह्या ट्रिक्स करतील तुम्हाला मदत
Apple Vision Pro सुमारे 2,90,810 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. या प्रोडक्टची किंमत प्रचंड आहे. त्यामुळे कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे या गॅझेटची विक्री झाली नाही. या सर्व कारणांमुळे आता अखेर कंपनीने या गॅझेटचं प्रोडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
व्हिजन प्रो हेडसेटवर कंटेंट नसणे आणि त्याची महागडी किंमत लोकांना पसंत नाही, असे सांगितले जात आहे. हे डिव्हाईस सुमारे 3 लाख रुपयांना लाँच करण्यात आले होते. या डिव्हाईसची मागणी कमी होण्याचं कारण म्हणजे त्याची प्रचंड किंमत. त्यामुळे आता कंपनी Apple Vision Pro चे स्वस्त वर्जन लाँच करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे.
या प्रकरणाची माहिती असलेल्या काही लोकांनी सांगितले की कंपनीने काही महिन्यांपूर्वी डिव्हाईसचे प्रोडक्शन कमी केले होते. याचा अर्थ असा की कंपनीच्या यादीत पुरेशी युनिट्स आहेत, ज्यामुळे यावर्षीच्या विक्रीवर परिणाम होणार नाही. मागणी अभावी कंपनीला प्रोडक्शन थांबवावे लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी iPhone 12 Mini सोबतही असेच घडले होते. मे महिन्यातच काही कारखान्यांमध्ये व्हिजन प्रो प्रोडक्शन मंदावले होते.
काही दिवसांपूर्वी असा अहवाल आला होता की Apple व्हिजन प्रोचे स्वस्त व्हेरिअंट आणू शकते. ॲपल व्हिजन या नावाने हे लाँच केले जाणार असून त्यात काही फीचर्स कमी केले जाऊ शकतात. ॲपल व्हिजन परवडणाऱ्या किंमतीत लाँच केला जाईल जेणेकरून हे डिव्हाईस अधिकाधिक लोकांना उपलब्ध करून देता येईल. ॲपल व्हिजनची किंमत कमी ठेवण्यासाठी कमी दर्जाचा डिस्प्ले यामध्ये दिला जाऊ शकतो.
Apple ग्लास-आधारित OLED किंवा LTPO बॅकप्लेन तंत्रज्ञानासह LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हे डिस्प्ले कमी किमतीत उत्तम परफॉर्मन्स देण्यासाठी ओळखले जातात. या नवीन ॲपल व्हिजन डिव्हाईसचे स्पेसिफिकेशन्स अद्याप समोर आले नाहीत. तसेच हे नवीन डिव्हाईस कधी लाँच केले जाणार, त्याची किंमत काय असेल याबद्दल देखील अद्याप माहिती देण्यात आली नाही. मात्र जर कमी किंमतीत उत्तम फीचर्स मिळाले, तर हे डिव्हाईस ग्राहकांना पसंत पडेल यात काही शंकाच नाही.