Google Map Update: गुगल मॅपमध्ये होणार मोठे बदल, आता फ्रीमध्ये मिळणार या सर्विस
लोकप्रिय नेव्हिगेशन ॲप गुगल मॅपमध्ये लवकरच मोठे बदल होणार आहेत. गुगल मॅप आपल्या डेवलपर्सना अधिक चांगल्या सर्विस ऑफर करण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत गुगलने घोषणा देखील केली आहे. गुगलने सांगितलं आहे की, भारतीय डेवलपर्सना गुगल मॅप्समध्ये अधिक वैशिष्ट्ये दिली जाणार आहेत. आता भारतीय डेवलपर्स मार्ग, ठिकाणे आणि एनवायरनमेंट एप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) आणि सॉफ्टवेयर डेवलपमेंट किट (SDK) इत्यादीचा विनामूल्य वापरण्यास सक्षम असतील. ही सेवा 1 मार्च 2025 पासून उपलब्ध होईल.
Google Map Update: गुगल मॅप ठरतोय अपघाताचं कारण? सुरक्षित प्रवासासाठी लक्षात ठेवा या टीप्स
1 मार्च 2025 पासून, डेवलपर्सना मंथली लिमिटपर्यंत मॅप्स, रूट्स, स्थान आणि एनवायरमेंट प्रोडक्ट्स या सुविधांसाठी विनामूल्य प्रवेश मिळेल. हे त्यांना कोणत्याही अपफ्रंट कॉस्टशिवाय प्रॉक्सिमिटी आणि डायनॅमिक स्ट्रीट व्ह्यू यासारखी विविध प्रोडक्ट्स सहजपणे एकत्रित करण्यास अनुमती देईल. (फोटो सौजन्य – pinterest)
गूगल मॅप्स प्लेटफॉर्मचे प्रोडक्ट मॅनेजमेंटचे सीनियर डायरेक्टर टीना वेयंड यांनी सांगितलं की, भारतीय डेवलपर्सना 1 मार्च 2025 पासून सेवांचा मोफत वापर करता येईल, याचा अर्थ असा आहे की, आज आम्ही जे 200 डॉलरचे मंथली क्रेडिट देत आहोत, त्याऐवजी डेवलपर्स लवकरच 6,800 डॉलरपर्यंतची वॅल्यू असणाऱ्या सर्विस फ्रीमध्ये वापरू शकतील.
भारतात गुगल मॅप्स प्लॅटफॉर्मचा वापर डिलिव्हरीपासून ते ट्रॅव्हल ॲप्स बनवण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी केला जातो. “आमची भारतातील व्याप्ती 7 दशलक्ष किलोमीटरहून अधिक रस्ते, 30 कोटी इमारती आणि 35 दशलक्ष व्यवसाय आणि ठिकाणांपर्यंत पसरलेली आहे,” असं वेयंड म्हणाल्या.
आता भारतीय डेवलपर्स मार्ग, ठिकाणे आणि एनवायरनमेंट एप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) आणि सॉफ्टवेयर डेवलपमेंट किट (SDK) इत्यादी विनामूल्य वापरण्यास सक्षम असतील. ही सेवा 1 मार्च 2025 पासून उपलब्ध होईल. गुगल मॅप्सचा वापर डिलिव्हरीपासून ते ट्रॅव्हल ॲप्स बनवण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये केला जातो.
टीना वेयांड म्हणाल्या, भारतात आमची व्याप्ती 70 लाख किलोमीटरहून अधिक रस्ते, 30 कोटी इमारती आणि 3.5 कोटी व्यवसाय आणि ठिकाणांपर्यंत पसरलेली आहे. टेक जायंटने म्हटले आहे की गुगल मॅप्स प्लॅटफॉर्मने अलीकडेच भारतात विशेष किंमत सादर केली आहे. यामध्ये बहुतांश API वरील 70 टक्क्यांपर्यंत कमी किंमती आणि ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) सह सहयोग समाविष्ट आहे, जे डेवलपर्सना निवडक गुगल मॅप्स प्लॅटफॉर्म API वर 90 टक्क्यांपर्यंत सूट देते. कंपनीने म्हटले आहे की या बदलांमुळे अनेक डेवलपर्सची बिले अर्ध्याहून अधिक कमी झाली आहेत आणि लहान डेवलपर्सची बिले आणखी कमी झाली आहेत.