लाँचिंगपूर्वीच Oppo Reno 13 चे स्पेसिफिकेशन लिक; काय असेल खास, जाणून घ्या
स्मार्टफोन कंपनी Oppo ची नवीनतम स्मार्टफोन सिरीज Oppo Reno 13 उद्या 25 नोव्हेंबर रोजी चीनमध्ये लाँच केली जाणार आहे. गेल्या आठवड्यात कंपनीने त्यांच्या या आगामी सिरीजबद्दल माहिती शेअर केली होती. तसेच काही फोटो देखील शेअर केले होते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही नवीन सीरीज Reno 12 सीरीजमध्ये अपग्रेड म्हणून लाँच केली जाईल. कंपनीने या सिरीजमधील स्पेसिफिकेशन्सबद्दल माहिती शेअर केली नव्हती. मात्र आता Oppo Reno 13 सिरीजबद्दलचे स्पेसिफिकेशन समोर आले आहेत.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
लाँचिंगपूर्वीच Oppo Reno 13 सिरीजचे स्पेसिफिकेशन्स लिक झाले आहेत. Oppo Reno 13 सिरीजसह MediaTek Dimensity 8350 प्रोसेसरसह लाँच केली जाणार आहे. यामध्ये 16GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज दिलं जाणार आहे. Oppo Reno 13 सिरीज बेस मॉडेल 3 कलर पर्यायंमध्ये तर प्रो मॉडेल 4 कलर पर्यायांमध्ये लाँच केला जाणार आहे. (फोटो सौजन्य – X)

कंपनीने चीनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट Weibo वर केलेल्या पोस्टनुसार, आगामी Oppo Reno 13 सिरिजीमधील बेस मॉडेल Oppo Reno 13 बटरफ्लाय पर्पल, गॅलेक्सी ब्लू, मिडनाईट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. कंपनीचे म्हणणे आहे की या सिरीजमधील Oppo Reno Pro या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये तसेच एक विशेष स्टारलाईट पिंक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल.
Reno 13 चे स्टॅण्डर्ड मॉडेल 12GB+256GB, 12GB+512GB, 16GB+256GB, 16GB+512GB आणि 16GB+1TB रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असेल. Reno 13 Pro वर उल्लेख केलेल्या समान प्रकारांमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजसह उपलब्ध असेल. फक्त 16GB + 256GB व्हेरिएंट Reno 13 Pro मध्ये उपलब्ध होणार नाही.
Oppo ने त्याच्या आगामी मिडरेंज हँडसेटचे काही फीचर्स कन्फर्म केले आहेत. स्मार्टफोन निर्मात्याचे म्हणणे आहे की आगामी Reno 13 सिरीज डायमेंसिटी 8350 प्रोसेसरने सुसज्ज असेल. जुन्या बेंचमार्क परिणामांवरून असे दिसून आले आहे की लाइनअप डायमेंसिटी 8300 सह येईल, याचा अर्थ असा की ती त्याच चिपची पुनर्ब्रँडेड आवृत्ती असू शकते.

कंपनीच्या मते, आगामी Reno 13 लाइनअपमध्ये 1.5K रिझोल्यूशनसह डिस्प्ले असेल आणि कंपनीने सांगितलं आहे की या सिरीजमध्ये हाय ब्राइटनेस लेव्हल देखील दिली जाणार आहे.
Oppo ने दावा केला आहे की Reno 13 सिरीजची बॅटरी त्याच्या मागील मॉडेल्सपेक्षा मोठी असेल आणि पाच वर्षांपर्यंत विश्वसनीय परफॉर्मंस देईल.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Oppo Reno 13 सिरीज लाँच झाल्यानंतर हँडसेटबद्दल अधिक माहिती समोर येईल. हा फोन 25 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या चीनमध्ये लाँच होईल. कंपनीने भारतासह जागतिक बाजारपेठेत Reno 13 लाइनअप लाँच करण्याची कोणतीही योजना अद्याप जाहीर केलेली नाही.






