Lava Blaze Duo 5G: भारतात सुरु झाली दोन डिस्प्लेवाल्या स्मार्टफोनची सेल, डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
स्मार्टफोन कंपनी Lava ने त्यांचा स्वस्त आणि दोन डिस्प्लेवाला स्मार्टफोन नुकताच भारतात लाँच केला आहे. बजेट किंमतीत लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची सेल 20 डिसेंबरपासून सुरु झाली आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवरून ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. दोन डिस्प्ले व्यतिरिक्त, या फोनमध्ये 6nm MediaTek Dimensity 7025 प्रोसेसर, 64MP प्राथमिक कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी सारखी वैशिष्ट्ये आहेत.
Maha Kumbh Mela 2025: राहण्यापासून ते पार्किंगपर्यंत, हा अॅप देणार कुंभ मेळ्याचे सर्व अपडेट
Lava Blaze Duo 5G स्मार्टफोन 6GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 128GB अशा दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या च्या 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा फोन सेलेस्टियल ब्लू आणि आर्क्टिक व्हाईट कलर पर्यायांमध्ये खरेदी करू शकतात.
20 डिसेंबरपासून दुपारी 12 वाजता Amazon वरून Lava Blaze Duo 5G स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. विशेष बाब म्हणजे एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट होल्डर्स देखील 20 डिसेंबर ते 22 डिसेंबर दरम्यान 2,000 रुपयांच्या त्वरित सवलतीचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला हा बजेट स्मार्टफोन आणखी कमी किंंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
डिस्प्ले- Lava Blaze Duo 5G फोनमध्ये 6.67-इंच फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सेल) 3D कर्व्ड AMOLED स्क्रीन आहे. तसेच, मागील पॅनेलवर 1.58 इंच (228×460 पिक्सेल) AMOLED स्क्रीन आहे. Dual-SIM (Nano + Nano) सपोर्ट Lava Blaze Duo 5G Android 14 वर चालतो. कंपनीने दावा केला आहे की, या स्मार्टफोनला भविष्यात Android 15 वर अपडेट मिळेल.
प्रोसेसर – कंपनीने या हँडसेटमध्ये MediaTek Dimensity 7025 प्रोसेसर दिला आहे, जो 8GB पर्यंत LPDDR5 RAM सह जोडलेला आहे. Blaze Duo 5G मध्ये या प्रोसेसरसह, तुम्हाला 128GB UFS 3.1 स्टोरेज मिळते, जे मेमरी कार्ड वापरून वाढवता येत नाही.
कॅमेरा – फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूला अननोन सोनी सेन्सरसह 64-मेगापिक्सलचा प्रायमरी रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. 2-मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा देखील आहे जो डेप्थ इंफॉर्मेशन कॅप्चर करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. फोनच्या पुढील बाजूला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
iOS 18.3: Apple चे iOS 18.3 बीटा अपडेट अखेर रिलीझ, नवीन वैशिष्ट्यांसह Siri झाली स्मार्ट
फीचर्स – Lava Blaze Duo मध्ये 5G, 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth 5.2, GPS आणि USB Type-C पोर्टमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी सपोर्ट आहे. एक्सेलेरोमीटर, प्रॉक्सिमिटी सेंसर, जायरोस्कोप, ई-कंपास आणि एंबियंट लाइट सेन्सरने सुसज्ज आहे.
बॅटरी – Lava Blaze Duo 5G मध्ये 33W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 5,000mAh बॅटरी आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी हँडसेट इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह सुसज्ज आहे. फोनला डस्ट आणि स्प्लॅश रेझिस्टन्ससाठी IP64 रेटिंग देण्यात आली आहे.