iOS 18.3: Apple चे iOS 18.3 बीटा अपडेट अखेर रिलीझ, नवीन वैशिष्ट्यांसह Siri झाली स्मार्ट
टेक जायंट कंपनी Apple ने काही दिवसांपूर्वीच त्यांचे नवीन iOS 18.2 अपडेट रिलीज केले आहे. या अपडेटनंतर आता कंपनीने 18.3 बीटा अपडेट देखील रिलीज केले आहे. याबाबत कंपनीने माहिती शेअर केली असून 18.3 बीटा अपडेटचे स्टेबल वर्जन जानेवारी 2025 मध्ये अधिकृतपणे रिलीज होण्याची अपेक्षा आहे.
Honor GT: पावरफुल बॅटरी आणि दमदार कॅमेरा, लाँच झाला Honor चा नवीन स्मार्टफोन
स्टेबल वर्जनमध्ये कंपनी अनेक नवीन फीचर्सचा समावेश करणार आहे. या नवीन फीचर्समुळे युजर्सचा अनुभव अधिक मजेदार होणार आहे. याशिवाय AI आणि Siri ला देखील अपग्रेड मिळणार आहे. नवीन अपग्रेडमुळे सिरी पूर्वीपेक्षा अधिक स्मार्ट होणार आहे आणि युजर्सच्या प्रश्नांची अधिक चांगली उत्तर देणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
कंपनीने या अपडेटच्या स्टेबल वर्जनबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. मात्र जानेवारी 2025 मध्ये हे वर्जन रिलीज केलं जाण्याची अपेक्षा आहे. बीटा अपडेट्स आल्यावर अधिक तपशील उपलब्ध होतील. ॲपलची व्हॉइस असिस्टंट सिरी आता आणखी चांगली होईल. त्यामुळे आयफोन युजर्सना सिरीसोबत संवाद साधताना अधिक मजा येणार आहे.
कंपनीने रिलीज केलेल्या अलीकडील अपडेटमध्ये सिरीला अनेक मोठे अपग्रेड प्राप्त झाले आहेत. युजर्स आता चॅटजीपीटी संवादासह जटिल प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी सक्षम असणार आहेत. iOS 18.3 हे अपडेटमध्ये AI ची व्याप्ती अधिक वाढणार आहे.
iOS 18.3 च्या स्टेबल अपडेटमध्ये अनेक बग फिक्स करून परफॉर्मंस देखील सुधारले जाईल. ॲपल सिस्टमला सुरळीत करण्यासाठी काही नवीन गोष्टींचा समावेश करू शकते. तसेच, एड्रेस सिक्योरिटीच्या समस्येचे निराकरण केल्यानंतर, युजर्सचा अनुभव अधिक चांगला होणार आहे.
iOS 18.3 बीटा केवळ iPhone वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध नाही, Apple ने iPadOS 18.3, macOS Sequoia 15.3, watchOS 11.3 आणि tvOS 18.3 सह इतर प्लॅटफॉर्मसाठी सार्वजनिक बीटा देखील जारी केला आहे. यापैकी, macOS 15.3 त्याच्या नवीन Genmoji वैशिष्ट्यासह अधिक मजेदार बनले आहे.
Apple iOS 18.3 चे स्टेबल अपडेट जारी करण्यास वेळ लागू शकतो, परंतु बीटा अपडेटद्वारे माहिती हळूहळू उपलब्ध होत आहे. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला अपडेट आणले जाण्याची शक्यता आहे. हे अपडेट सिरीमध्ये बदल आणू शकते.