Maha Kumbh Mela 2025: राहण्यापासून ते पार्किंगपर्यंत, हा अॅप देणार कुंभ मेळ्याचे सर्व अपडेट
Maha Kumbh Mela 2025: प्रयागराजमध्ये 2025 मध्ये महाकुंभ सुरू होणार आहे. महाकुंभाला देशातूनच नव्हे तर जगभरातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. 12 वर्षातून एकदा महाकुंभ आयोजित केला जातो. महाकुंभात स्नानाला विशेष महत्त्व आहे. या दिमाखदार सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. हा कुंभमेळा 45 दिवस चालणार आहे. महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव मानला जातो. सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी आणि धर्माला समाजाशी जोडण्यासाठी महाकुंभ मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो. 13 जानेवारी 2025 पासून महाकुंभ मेळा सुरू होणार आहे. हा कुंभमेळा 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
Year Ender 2024: मायक्रोसॉफ्टपासून रेल्वेपर्यंत, हे आहेत 2024 चे मोठे आउटेज! जगावर झाला होता परिणाम
महाकुंभासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, त्यांना राहण्यापासून ते पार्किंगपर्यंत अगदी सर्व सुविधांचा व्यवस्थित लाभ घेता यावा, यासाठी प्रथमच एआय चॅटबॉट विकसित करण्यात आला आहे. या चॅटबॉटद्वारे तुम्हाला कुंभची सर्व प्रकारची माहिती सहज मिळेल. महाकुंभ 2025 ला येणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी एक कंप्यूटर प्रोग्राम तयार करण्यात आला आहे. हा कार्यक्रम लोकांना आवश्यक माहिती सतत देत राहील. त्यामुळे या उत्सवाला येणाऱ्या लोकांना सतत अपडेट मिळतील. Kumbh SahAIyak Chatbot असं या चॅटबोटचं नाव आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Kumbh SahAIyak Chatbot हा एक कंप्यूटर प्रोग्राम आहे, जो महाकुंभ मेळ्यात येणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा कार्यक्रम लोकांना प्रत्येक वेळी आवश्यक माहिती देईल, त्यांना मार्ग दाखवेल आणि त्यांना मदत करेल. हा प्रोग्राम अनेक भाषांमध्ये काम करेल, ज्यामुळे विविध देशांतून येणारे लोकही त्याचा वापर करू शकतील.
अनेक भाषांमध्ये उपलब्ध: Kumbh SahAIyak Chatbot हा हिंदी आणि इंग्रजीसह 10 हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. हा चॅटबोट Bhashini अॅपसोबत जोडलेला आहे.
सोपं संभाषण: लोक या चॅटबॉटशी मजकूर संदेश किंवा आवाजाद्वारे बोलू शकतात, त्यामुळे सर्व प्रकारचे लोक या चॅटबोटचा वापर करण्यासाठी सक्षम असणार आहे.
रस्ता शोधण्यासाठी होणार मदत: Kumbh SahAIyak Chatbot हा Google Maps सह एकत्रित केल्यामुळे, लोकांना गंगा स्नानाचे घाट, मंदिरे, साधू आखाडे, रेल्वे स्थानके, बस स्टँड आणि पार्किंगच्या ठिकाणी पोहोचण्यास मदत होणार आहे.
सांस्कृतिक समज: हा चॅटबॉट महाकुंभचा इतिहास, परंपरा आणि महत्त्व समजावून सांगेल, ज्यामुळे तुम्हाला हा सांस्कृतिक अनुभव अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल.
प्रवास सुविधा: महा कुंभ मेळ्यात येणाऱ्या लोकांसाठी सरकारी मान्यताप्राप्त टूर पॅकेजेस, स्थानिक हॉटेल्स, होमस्टे आणि प्रवास याबाबत सल्ला मिळेल.
तुम्ही महाकुंभ 2025 मोबाईल अॅप किंवा व्हॉट्सॲपवर Kumbh Sah’AI’yak chatbot वापरू शकता. सर्व प्रकारच्या लोकांना याचा वापर करता येणार आहे. हा चॅटबॉट रीअल-टाइम माहिती देईल आणि लोकांना मदत करेल, जेणेकरून देश-विदेशातून येणारे लोक महाकुंभ मेळ्याला सहज जाऊ शकतील. 13 जानेवारी 2025 रोजी पौष पौर्णिमेपासून महाकुंभमेळा सुरू होईल आणि 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीला संपेल.