Elon Musk चा नवीन प्लॅन! Sony Playstation ला देणार टक्कर, लवकरच लाँच करणार गेमिंग स्टूडियो
सोशल मिडीया प्लॅटफॉर्म एक्सचा मालक असलेल्या एलोन मस्कने आता एक गेमिंग स्टुडिओ लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. एलोन मस्कचा हा गेमिंग स्टुडिओ सोनी प्ले स्टेशनला टक्कर देणार असल्याचं सांगितलं जात आहे. एलोन मस्कने त्याच्या नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI अंतर्गत एक नवीन गेमिंग स्टुडिओ सुरू करण्याची योजना आखली आहे. याशिवाय मस्कने चॅटजीपीटी आणि जेमिनिला टक्कर देण्यासाठी Grok AI चे एक स्वतंत्र चॅटबोट अॅप देखील लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
एलोन मस्कने एक्सवर सांगितले की गेमिंग उद्योगात क्रांती आणणे आणि मायक्रोसॉफ्टच्या Xbox आणि सोनीच्या स्टेशन सारख्या मोठ्या कंपन्यांना आव्हान देणे हे त्याचे ध्येय आहे. Dogecoin सह-संस्थापक बिली मार्कस यांनी गेमिंग उद्योगावरील मोठ्या कंपन्यांच्या वर्चस्वावर टीका केली होती, ज्याच्या प्रतिसादात मस्कने गेमिंग उद्योगात क्रांती करण्याचे वचन दिले आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
मस्क आणि मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांच्यातील Xbox वरील अलीकडील वादाच्या दरम्यान ही घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये Xbox वर टीका करण्यात आली होती. या वादाच्या दरम्यान, आता मस्कने एक नवीन पाऊल उचलले आहे, ज्याद्वारे तो गेमिंगचे जग बदलण्याच्या तयारीत आहे. या नवीन प्रयत्नात, तो एआय वापरून नवीन तंत्रज्ञानाच्या कल्पनांना प्रोत्साहन देईल.
Um, @satyanadella, this is illegal … https://t.co/54GC5VW5ZJ
— Elon Musk (@elonmusk) November 27, 2024
एक पॉडकास्टर, इयान माइल्स चोंग यांनी एक्सवर दावा केला की मायक्रोसॉफ्ट त्याच्या भरती प्रक्रियेत गोऱ्या लोकांशी भेदभाव करते. या आरोपांना उत्तर देताना मस्कने नडेला यांना टॅग केले आणि म्हटले की, “हे बेकायदेशीर आहे.”
Too many game studios that are owned by massive corporations. @xAI is going to start an AI game studio to make games great again! https://t.co/UR4nFODyfd
— Elon Musk (@elonmusk) November 27, 2024
यापूर्वी, मस्कने Xbox च्या नवीन गेम Avowed मधील एका वैशिष्ट्यावर देखील नाराजी व्यक्त केली होती, ज्यामध्ये लोक स्वतःसाठी सर्वनाम निवडू शकतात. xAI गेम स्टुडिओसह, मस्कला गेमिंगचे जग बदलायचे आहे. तो गेम तयार करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि गेम अधिक मनोरंजक बनवण्यासाठी AI चा वापर करणार आहे.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
एलोन मस्कची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI एआय क्षेत्रात उशिराने दाखल झाली असेल, पण ती झपाट्याने हे अंतर कमी करत आहे. xAI आता विनामूल्य AI मॉडेलची चाचणी करत आहे. xAI लवकरच OpenAI शी स्पर्धा करण्यासाठी ChatGPT सारखे स्वतंत्र चॅटबॉट ॲप लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितलं जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मस्कचे उद्दिष्ट Grok AI एक स्वतंत्र ॲप म्हणून लाँच करण्याचे आहे. अहवालात दावा केला आहे की xAI लवकरच Grok साठी एक चॅटबॉट ॲप लाँच करू शकते, जे ChatGPT सारखे असेल.