आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) चा वापर ज्या त्या क्षेत्रात होत आहे. गेल्या काही काळापासून वैधकीय क्षेत्रात देखील आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) चा वापर वाढला आहे. त्यामुळे आजार ओळखणे सोपे झाले आहे. आता AIच्या मदतीने हृदयाशी संबंधित आजार काही सेकंदात शोधता येतात. इम्पीरियल कॉलेज लंडनमधील संशोधकांनी आता एक स्टेथोस्कोप विकसित केला आहे जो एआयच्या मदतीने फक्त १५ सेकंदात तीन आजार ओळखू शकतो.चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर.
13 नंतर डायरेक्ट Oneplus 15 आणणार कंपनी? फोटो-फिचर्स झाले लीक, होणार मोठा बदल
कोणते आजार ओळखू शकतो एआय-चालित स्टेथोस्कोप
एआय-चालित स्टेथोस्कोप हे केवळ १५ सेकंदात तीन आजार ओळखू शकतो. हृदय फेल्युअर, अॅट्रियल फायब्रिलेशन आणि व्हॉल्व्हुलर हृदयरोग या तीन आजारांना शोधू शकतो. जुने स्टेथोस्कोप केवळ रुग्णाच्या हृदयाचे ठोके किंवा श्वासोच्छवासाचा आवाज ऐकू शकतो, तर एआय-चालित स्टेथोस्कोप हृदयाचे ठोके किंवा रक्तप्रवाहातील किरकोळ बदल देखील लक्षात घेऊ शकतो. यासोबतच, तो रुग्णाचा ECG करण्यास देखील सक्षम आहे. स्टेथोस्कोप १८१६ मध्ये पहिल्यांदा वापरण्यात आला. आता यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, लाखो लोकांचे जीव वाचवता येतात.
कसे करते काम?
रुग्णाच्या छातीवर ईसीजीसाठी AI स्टेथोस्कोप ठेवला जातो. तो हृदयातून निघणाऱ्या विद्युत सिग्नलची नोंद करतो, तर त्याला जोडलेला मायक्रोफोन हृदयाकडे वाहणाऱ्या रक्ताचा आवाज रेकॉर्ड करतो. यानंतर, एआय अल्गोरिथम या डेटाचे विश्लेषण करतो. हे अल्गोरिथम डॉक्टरांना आढळू न शकणाऱ्या बदलांची देखील नोंद करू शकते. प्रक्रियेनंतर, संपूर्ण डेटा स्मार्टफोन अॅपवर पाठवला जातो, जो रुग्णाच्या हृदयाचे आरोग्य शोधू शकतो. चाचणीतून असे दिसून आले की हे उपकरण पुढील १२ महिन्यांत एखाद्या व्यक्तीला कोणत्या हृदयाशी संबंधित आजाराचा सामना करावा लागू शकतो याचा अंदाज लावू शकते. या आधारावर, त्याची दैनंदिन दिनचर्या बदलण्यासोबतच, तो त्यावर उपचार देखील सुरू करू शकतो.
AI ला खासगी माहिती देताय? वेळीच व्हा सावध! हॅकर्स तुम्हाला बनवू शकतात शिकार
आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. कामात मदत असो, अभ्यास असो किंवा इतर कोणतीही माहिती मिळवायची असो, लोक ChatGPT, Grok, Copilot, किंवा Meta AI सारख्या चॅटबॉट्सचा सर्रास वापर करतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच याचा वापर करत आहेत, पण सोयीसोबतच धोकेही वाढले आहेत.
नुकत्याच ChatGPT आणि Grok वरून डेटा लीक झाल्याच्या घटनांनी हे स्पष्ट केले आहे की, या चॅटबॉट्सवर शेअर केलेली माहिती नेहमीच सुरक्षित नसते. लाखो युजर्सच्या खासगी चॅट आणि संवेदनशील डेटा लीक झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. याच कारणामुळे, जेव्हाही तुम्ही AI चा वापर कराल तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हा माणूस नाही, तर एक सिस्टीम आहे जी तुम्ही दिलेली माहिती साठवून ठेवते आणि प्रोसेस करते. त्यामुळे, जर तुम्ही तुमची वैयक्तिक किंवा गोपनीय माहिती यात टाकली तर ती सायबर गुन्हेगारांपर्यंत सहज पोहोचू शकते.