मनोज जरांगे पाटील यांनी सोडले उपोषण (फोटो- सोशल मीडिया)
राज्य सरकारने काढला आरक्षणाचा जीआर काढला
जीआरमध्ये शंका असल्यास निरसन करू – विखे पाटील
जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य
Maratha Reservation Live: राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. दरम्यान आपण आरक्षणाची लढाई जिंकलो आहोत असे, जरांगे पाटील यांनी घोषणा केली आहे. आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील लोकांना पण आरक्षण मिळेल असे जरांगे पाटील म्हणाले आहेत. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आपले पाच दिवसांचे उपोषण सोडले आहे.
मनोज जरांगे पाटील गेले पाच दिवस मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत होते. दरम्यान राज्य सरकारने आरक्षणाचा जीआर काढल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले आहे. दरम्यान उपोषण सोडल्यावर जरांगे पाटील यांना अश्रु अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले आहे. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आरक्षणाची लढाई जिंकल्याचे समाधान पाहायला मिळाले. त्यांनी गुलाल उधळून हा आनंद साजरा केला. तसेच आंदोलकांनी सावकाशपणे आपल्या गावी जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच रात्री 9 पर्यंत मुंबई रिकामी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाबाबत ‘या’ सहा मागण्या झाल्या मान्य
मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझिटिरच्या अंमलबजावणीची महत्त्वाची मागणी केली होती. राज्य सरकारकडून ही मागणी मान्य करण्यात आली आहे. हैदराबाद गॅझिटिरच्या अंमलबजावणी सरकार तातडीने सुरु करणार आहे. त्याचबरोबर मराठा आंदोलनामध्ये मराठा तरुणांवर दाखल झालेले सर्व गुन्हे माफ करण्यात येणार आहे. मराठा आंदोलकांवर सर्व गुन्हे मागे घेणार असल्याचा देखील जीआर काढला जाणार आहे. याचबरोबर कुणबी प्रमाणपत्राबाबत देखील राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे. सरकार 58 लाख कुणबी नोंदीचा रेकॉर्ड ग्रामपंतायतींवर लावणार आहे.
त्याचबरोबर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांबाबत होती. मराठा आरक्षणाच्या आंदोलमनामध्ये बलिदान दिलेल्या कुटुंबांना सरकार एका आठवड्यात मदत देणार असल्याचे देखील जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यपालांच्या स्वाक्षरीने तातडीने मराठा बांधवांच्या या मागणीबाबत GR काढला जाणार आहे. अशा सहा मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या मान्य झाल्या आहेत.