सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
Sara Tendulkar and Siddharth Kerkar photo goes viral : सारा तेंडुलकर आणि भारतीय संघाचा स्टार खेळाडू शुभमन गिल यांच्या नात्याबाबत खूप वेळा चर्चा होत असते. सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबाबत अनेक प्रतिक्रिया येत असतात. अशातच आता सारा तेंडुलकरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावरून आता शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या नावाची पुनः चर्चा सुरू झाली आहे. परंतु, यावेळी सारा सोबत गिल नसून दुसराच तरुण दिसत आहे. व्हायरल झालेले फोटो हे गोव्यातील असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. आपण या फोटोमागील सत्यता नेमकीम काय? याबाबत आपण जाणून घेऊया.
महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकरसोबतचा असणारा तो मुलगा कोण? तर याबबत माहिती अशी आहे की, सारासोबत असणाऱ्या मुलाचे नाव सिद्धार्थ केरकर असल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर त्याचे वर्णन व्यावसायिक असल्याचे केले आहे. त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून से लासख्यात येते की तो एक कलाकार असल्याचे कळते. आता, सिद्धार्थ केरकरच्या आणि सारा तेंडुलकर यांच्या नात्याबाबत आता लोकांमध्ये संभ्रम आहे.
सोशल मीडियावर सिद्धार्थ केरकरला सारा तेंडुलकरचा बॉयफ्रेंड असल्याचे बोलले जात आहे. अर्थात, व्हायरल झालेल्या फोटोंमधील दोघांचेही हावभाव सारखेच असल्याचे दिसत आहे. तरीही नावराष्ट्र या दोघांमधील नात्याबद्दल कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.
सारा तेंडुलकरचे नाव शुभमन गिलच्या नावासोबत जोडले जात आले आहे. आजही जोडले जाते. दोघांचे सोबत असलेले अनेक फोटो सोशल व्हायरल झाले होते. पण नंतर त्यांच्या नात्याची बातमी अफवा असल्याचे समोर आले होते. सोशल मीडियावर फोटो समोर आल्यानंतर सारा तेंडुलकरचे सिद्धार्थ केरकरसोबतचे नाते याकडे आता दुर्लक्ष करणे कठीण मानले जात आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणाबाबत अद्याप काही एक स्पष्ट नाही.
पंजाब पुर दुर्घटनेवर शुभमन गिलने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शुभमन गिलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिले आहे की, “आपल्या पंजाबला पुराने उद्ध्वस्त झालेले पाहून मन तुटत आहे. पंजाब प्रत्येक संकटापेक्षा बलवान आहे. आपण यातून सावरू आणि पुन्हा उभे राहू. माझ्या प्रार्थना सर्व बाधित कुटुंबांसोबत आहेत. मी माझ्या लोकांसोबत खंबीरपणे उभा आहे.”