UPI Payment Without Internet: आजकाल जवळपास प्रत्येकजण डिजिटल पेमेंटचा वापर करतो. शहरांपासून ते गावांपर्यंत, लोक दैनंदिन व्यवहारांसाठी रोख रकमेऐवजी ऑनलाइन व्यवहारांना प्राधान्य देत आहेत. परंतु, जेव्हा नेटवर्क कमकुवत असते किंवा इंटरनेट कनेक्शन नसते, तेव्हा मोठी अडचण येते. अशा परिस्थितीत आता वापरकर्त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण UPI पेमेंट इंटरनेटशिवायही करता येते. चला, ही पेमेंट पद्धत सोप्या भाषेत समजून घेऊया.
या सुविधेचा वापर करण्यासाठी तुम्हाला स्मार्टफोन किंवा कोणत्याही ॲपची आवश्यकता नाही. फक्त एक साधा मोबाईल फोन आणि तुमचा UPI पिन पुरेसा आहे. ही पद्धत अत्यंत सोपी आहे, ज्याची माहिती खालील पायऱ्यांमध्ये दिली आहे:
1. तुमच्या फोनमधून *99# डायल करा.
2. तुम्हाला हवी असलेली भाषा (Language) निवडा.
3. मेनूमधून ‘Send Money’ पर्याय निवडा.
4. पैसे पाठवणाऱ्याची माहिती (Receiver Details) निवडा: UPI ID, मोबाईल नंबर किंवा बँक खाते क्रमांक टाका.
5. तुम्हाला पाठवायची असलेली रक्कम (Amount) भरा.
6. शेवटी, तुमचा UPI PIN टाकून व्यवहार (Transaction) कन्फर्म करा.
7. काही सेकंदात तुमचे पेमेंट यशस्वी होईल आणि यासाठी इंटरनेटची गरज लागणार नाही.
इंटरनेटशिवाय UPI पेमेंटची ही सुविधा सध्या देशातील जवळजवळ सर्व मोठ्या बँकांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये SBI, HDFC, ICICI, Axis Bank, PNB आणि Bank of Baroda यासह अनेक बँकांचा समावेश आहे.