Oneplus 15 चे फिचर्स लीक (फोटो सौजन्य - X.com)
OnePlus चा पुढील फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 15 लाँच होण्यापूर्वीच प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. नुकत्याच ऑनलाइन लीक झालेल्या एका फोटोमुळे त्याच्या डिझाइन आणि रंग पर्यायांबद्दल माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे यावेळी कंपनी त्याच्या जुन्या वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूलऐवजी चौकोनी कॅमेरा आयलंड वापरू शकते.
टिपस्टर सुधांशू अंभोरे यांनी X (पूर्वीच्या ट्विटर) वर शेअर केलेल्या रेंडरमध्ये OnePlus 15 चौकोनी कॅमेरा मॉड्यूलसह दाखवले आहे, ज्यामध्ये तीन कॅमेरा सेन्सर दिसतात. या मॉड्यूलच्या कोपऱ्यांना गोल आकार देण्यात आला आहे, जो त्याला प्रीमियम फील देतो. फोनसाठी तीन रंग पर्याय लीक झाले आहेत, ज्यात काळा, जांभळा आणि टायटॅनियम समाविष्ट आहे (फोटो सौजन्य – X.com)
कसा असणार OnePlus 15
OnePlus 15 अनेक RAM आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. यामध्ये 12GB RAM + 256GB स्टोरेज, 12GB RAM + 512GB स्टोरेज, 16GB RAM + 256GB स्टोरेज, 16GB RAM + 512GB स्टोरेज आणि 16GB RAM + 1TB स्टोरेज (टॉप व्हेरिएंट) समाविष्ट आहेत.
OnePlus 15 हा स्मार्टफोन अलीकडेच गीकबेंचवर देखील दिसला होता, जिथे तो स्नॅपड्रॅगन 8 Elite 2 (Gen 5) चिपसेटसह सूचीबद्ध करण्यात आला होता. असे मानले जाते की फोनमध्ये 1.5K रिझोल्यूशनसह 6.78-इंचाचा फ्लॅट LTPO डिस्प्ले आणि 165Hz पर्यंतचा रिफ्रेश रेट मिळेल. यावेळी कंपनी बॅटरीच्या बाबतीत मोठे अपग्रेड आणू शकते. लीक झालेल्या अहवालांनुसार, फोनमध्ये पॉवरसाठी 7,000mAh किंवा त्याहून मोठी बॅटरी दिली जाऊ शकते, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. वनप्लसने नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी खास वैशिष्ट्ये फोनमध्ये आणली आहेत आणि या फोनकडेही चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे आता हा फोन कधी बाजारात येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
WhatsApp ने Apple वापरकर्त्यांसाठी एक खास अपडेट जारी केले, जाणून घ्या नवीन अपडेट काय?
डायरेक्ट येणार OnePlus 15
मागील मॉडेल पाहता, OnePlus 13 गेल्या वर्षी लाँच करण्यात आला होता. त्यात स्नॅपड्रॅगन 8 Elite चिप, 24GB पर्यंत RAM आणि 1TB स्टोरेज मिळाले. त्यात 6.82-इंच क्वाड-HD+ LTPO 4.1 ProXDR डिस्प्ले, 6,000mAh बॅटरी, 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सारखी वैशिष्ट्ये होती. अशा परिस्थितीत, OnePlus 15 कडून अधिक शक्तिशाली कामगिरी आणि चांगली बॅटरी लाइफ अपेक्षित आहे. यासोबतच, असे दिसते की OnePlus त्याची OnePlus 14 मालिका वगळू शकते.
पहा सुधांशू अंभारेची पोस्ट
OnePlus 15 storage & color options, as per DCS
– 12GB+256GB, 12GB+512GB, 16GB+256GB, 16GB+512GB, and 16GB+1TB
– Black, Purple, and Titanium color options pic.twitter.com/Do9n9Uhaw9
— Sudhanshu Ambhore (@Sudhanshu1414) August 29, 2025