फोटो सौजन्य - Social Media
भारतातील अग्रगण्य फुल-स्टॅक मर्चंट पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएम (Paytm) ने या दिवाळीत आपल्या ग्राहकांसाठी खास ‘पेटीएम ट्रॅव्हल दिवाळी कार्निव्हल सेल’ सुरू केली आहे. या ऑफरचा उद्देश दिवाळीच्या सुट्टीत लाखो भारतीय प्रवाशांना अधिक किफायतशीर दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. म्हणूनच, जर तुम्ही या दिवाळीत कुठे बाहेर जाण्याची योजना आखत असाल, तर ही ऑफर तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते.
या सेलमध्ये प्रवाशांना देशांतर्गत फ्लाइट बुकिंगवर १५% पर्यंत सवलत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइटसाठी १०% फ्लॅट सूट मिळणार आहे. याशिवाय, बस बुकिंगवर २०% पर्यंत सवलत मिळू शकते. प्रवासी फक्त ₹८९९ मध्ये ट्रॅव्हल पास खरेदी करू शकतात. ‘PASSDIWALI’ हा कोड वापरून हा पास घेतल्यास फ्री कॅन्सलेशन आणि ट्रॅव्हल इन्शुरन्सचे फायदेही मिळतील.
फेस्टिव्ह ऑफरला अधिक आकर्षक बनवण्यासाठी पेटीएमने BOB कार्ड, RBL बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इंडसइंड बँक, HSBC आणि पंजाब नॅशनल बँक यांसारख्या प्रमुख बँकांसोबत भागीदारी केली आहे. या बँकांच्या कार्डधारकांना फ्लाइट बुकिंगवर ₹७५०० पर्यंत, तर बस बुकिंगवर ₹५०० पर्यंत सूट मिळू शकते.
पेटीएम ट्रॅव्हलचे प्रवक्ते म्हणाले, “दिवाळी हा सण म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी. लाखो लोक आपल्या घरी परततात, त्यामुळे आम्ही या सेलद्वारे त्यांचा प्रवास अधिक सोपा, सुरक्षित आणि किफायतशीर बनवण्याचा प्रयत्न करत आहोत.” मुळात, दिवाळी या सणामध्ये संपूर्ण घर एकत्र येतं. सण साजरा करतं. अशामध्ये PTM ने सुरु केलेली ही योजना फार फायदेशीर ठरणार आहे. देश विदेशातून सणासाठी आपापल्या घरी आलेल्यांना त्यांचा प्रवास अधिक सोपा करण्याची संधी तसेच प्रवासाला आणखीन सुरक्षित कसे करता येईल याचा विचार करता येणार आहे. या किफायतशीर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पेटीएम ट्रॅव्हलच्या प्रवक्त्यांनी केले आहे.
फ्री कॅन्सलेशन, तत्काळ परतावा आणि सुरक्षित पेमेंट प्रणालीमुळे पेटीएम ट्रॅव्हल हे देशातील प्रवाशांसाठी सर्वाधिक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म ठरले आहे. या दिवाळीत सवलतींसह स्मार्ट ट्रॅव्हलचा आनंद घेण्याची ही उत्तम संधी पेटीएमने आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.