स्मार्टफोन इंडस्ट्रीत मोठा ट्विस्ट! 'या' दिग्गज टेक कंपन्या बनल्या Oppo सब-ब्रँड, यूजर्सना बसला धक्का
असं सांगितलं जात आहे की, रिअलमी आणि वनप्लस दोन्ही एकाच कंपनीचे सब ब्रँड म्हणून काम करणार असले तरी देखील हे दोन्ही ब्रँड्स वेगवेगळी मार्केट स्ट्रेटेजी फॉलो करणार आहेत आणि वेगवेगळ्या यूजर्सना टार्गेट करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रिअलमी चे फाउंडर आणि सिईओ स्काई ली (Sky Li), रिअलमी आणि वनप्लस सह ओप्पोचे सर्व सब-ब्रँड्स मॅनेज करणार आहेत. यादरम्यान ली जी (Li Jie) त्यांच्या सध्याच्या भूमिकेत वनप्लस चीनचे प्रेसिडेंट म्हणून काम सांभाळणार आहेत. टेक ब्रँड ओप्पोचं असं म्हणणं आहे की, भूमिका स्पष्टपणे परिभाषित केल्याने अंतर्गत गोंधळ कमी होईल, फंक्शन्सचे ओव्हरलॅपिंग दूर होईल. तसेच प्रत्येक ब्रँडला त्यांच्या योजना अधिक प्रभावीपणे लागू करण्यासाठी देखील मदत होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
रिअलमीच्या आफ्टर-सेल्स सर्विसमध्ये देखील एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. रिअलमी आता ओप्पोच्या आफ्टर-सेल्स सर्विस नेटवर्कचा पूर्णपणे वापर करणार आहे. रिअलमीचे प्रोडक्ट्स त्यांनी ठरवलेल्या शेड्यूल प्रमाणेच लाँच केले जाणार आहेत. कंपनीने घेतलेल्या .या निर्णयाचा यूजर्सवर देखील काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण कंपन्यांच्या या निर्णयाला अनेक यूजर्सना नकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
व्यापाराच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, कंपन्यांना त्यांचा निर्णय अगदी योग्य वाटत आहे. रिअलमी आणि वनप्लस आता ओप्पोचे सबब्रँड म्हणून काम करणार आहेत. त्यामुळे आता रिसर्च आणि डेवलपमेंट, लॉजिस्टिक्स आणि आफ्टर-सेल्स सर्विससाठी वेगवेगळ्या संघांची गरज नाही. अशी आशा आहे की, ओप्पो सर्विस नेटवर्क आणि इंजीनियरिंग रिसोर्सला एकत्र करणार आहे. यामुळे कंपनीचा खर्च कमी होणार आहे आणि यामुळे जागतिक मेमरी चिपच्या कमतरतेसारख्या सध्याच्या आव्हानांना चांगल्या प्रकारे तोंड देण्यास मदत होईल.
कंपन्यांच्या या निर्णयाकडे यूजर्सच्या दृष्टिकोणातून पाहिले तर हा बदल नकारात्मक वाटू शकतो. यापूर्वी OnePlus ने OxygenOS ला ओप्पोच्या ColorOS सारखे सादर केले होते. आता Realme UI सोबत देखील असंच काही घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक यूजर्सनी चिंता व्यक्त केली आहे. जर तिन्ही ब्रँड्स सारखेच झाले तर त्यांच्यामध्ये कोणताही फरक जाणवणार नाही. यूजर्स फक्त वेगवेगळे ब्रँडची नावे पाहू शकतील मात्र, अनुभव जवळजवळ सारखाच वाटू शकतो.
Ans: Oppo, Realme आणि OnePlus एकत्र येणार म्हणजे काय?
Ans: नाही. दोन्ही ब्रँड्स बंद होणार नाहीत. ते स्वतंत्र नावानेच स्मार्टफोन्स लाँच करत राहतील.
Ans: खर्च कमी करणे, रिसर्च-डेव्हलपमेंट शेअर करणे आणि स्पर्धात्मक बाजारात अधिक ताकद मिळवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.






