Gadgets For Students: परीक्षेच्या तयारीसाठी हे गॅझेट्स करतील विद्यार्थ्यांची मदत! एका क्लिकवर वाचा संपूर्ण यादी
मार्च – एप्रिलमध्ये शाळा आणि कॉलेजच्या परीक्षा सुरु होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे परिक्षेच्या तयारीसाठी अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. शाळांमधील परीक्षांचे दिवस जसे जवळ येत आहेत, विद्यार्थी पूर्णपणे परीक्षेच्या तयारीत गुंतले आहेत. इतर कामांप्रमाणे, तंत्रज्ञानाचा वापर देखील विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. आज आम्ही अशा गॅझेट्सची यादी घेऊन आलो आहोत जे विद्यार्थ्यांना परिक्षेची तयारी करण्यासाठी मदत करणार आहेत.
पुस्तक, वह्या, नोट्स या सर्वांसोबतच आता विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान देखील परिक्षेची तयारी करण्यासाठी मदत करणार आहे. विद्यार्थी स्मार्टफोन किंवा टॅबलेट, संगणक किंवा लॅपटॉप, आवाज कमी करणारे हेडफोन, इलेक्ट्रिक केटल यांसारख्या गॅझेट्सचा वापर करून त्यांच्या परीक्षेची तयारी करू शकतात. अनेकजण असे असतात की ज्यांना पुस्तक वाचण्यापेक्षा व्हिडीओ पाहणे आणि ऑडीओ ऐकणं अधिक आवडतं. अशा विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोन किंवा टॅबलेट, संगणक किंवा लॅपटॉप हे गॅझेट्स फायद्याचे ठरू शकतात. चला तर मग नवीन तंत्रज्ञान आणि गॅझेट्स विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत करू शकतात, पाहूया. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्टफोन किंवा टॅब्लेट मुलांना परीक्षेची तयारी करण्यास मदत करू शकतात. स्मार्टफोन किंवा टॅबलेटचा काळजीपूर्वक वापर केल्यास, परीक्षेची तयारी करणे सोपे होते. आजकाल स्मार्टफोन ऑनलाइन क्लास, नोट्सची देवाणघेवाण इत्यादींमध्ये खूप मदत करतात. याशिवाय, अभ्यासातून थोडा ब्रेक घेऊन स्मार्टफोन आणि टॅब्लेट मनोरंजनासाठी देखील उपयुक्त ठरू शकतात. कारण सतत अभ्यास केल्याने कंटाळा येतो आणि अशावेळी आपल्याला मनोरंजनाचं साधन पाहिजे असते. अशा परिस्थितीत स्मार्टफोन किंवा टॅबलेट तुम्हाला मदत करू शकतात.
स्मार्टफोनप्रमाणेच, संगणक किंवा लॅपटॉप देखील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात. तुमच्या एकेडमिक पेपर्स वाचण्यापासून ते मॉक टेस्टचा सराव करणे, ऑनलाइन क्विझ सोडवणे आणि स्टडी मटेरियल रिवाईझ करण्यापर्यंत, लॅपटॉप विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारे उपयुक्त ठरू शकतो. याशिवाय, परीक्षेनंतर असाइनमेंट इत्यादी करण्यासाठी लॅपटॉप आणि संगणक देखील उपयुक्त आहेत. जर तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याला भेटवस्तू द्यायची असेल आणि बजेट कमी असेल तर अशावेळी लॅपटॉप स्टँड किंवा लॅपटॉप टेबल हा एक चांगला पर्याय असू शकतो.
हे हेडफोन विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. घरी परिक्षेची तयारी करताना बऱ्याच वेळा विद्यार्थी आजूबाजूला होणाऱ्या आवाजामुळे किंवा संभाषणांमुळे त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, नॉइज कॅन्सलेशन हेडफोन्स त्यांना आजूबाजूच्या आवाजापासून वाचवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतील.
हिवाळा अजून पूर्णपणे गेलेला नाही आणि विद्यार्थी तासंतास सतत परिक्षेच्या तयारीत व्यस्त असतात. अशा परिस्थितीत, इलेक्ट्रिक केटल त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. त्याच्या मदतीने विद्यार्थी त्यांचा चहा, कॉफी किंवा इतर पेये कोणत्याही त्रासाशिवाय गरम करू शकतात. रात्री अभ्यास करतानाही हे खूप उपयुक्त ठरेल.