Tech Tips: फोन चार्जरवर लिहीलेला R कोड कोणते संकेत देतो? 99% लोकं करतात दुर्लक्ष, वाचून व्हाल हैराण
तुम्ही जर कधी स्मार्टफोन चार्जरकडे काळजीपूर्वक पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, फोन चार्जरच्या मागील बाजूला एक खास कोड लिहीलेला असतो. हा कोड R ने सुरु होतो. यानंतर एक डॅश आणि काही नंबर लिहीलेले असतात. हा एक अधिकृत रजिस्ट्रेशन कोड असतो. हा कोड ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजेच BIS द्वारे जारी केला जातो. भारतात विक्री केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्ससाठी हा कोड गरजेचा असतो. याचा अर्थ असा आहे की, चार्जर सरकारद्वारे ठरवण्यात आलेल्या सुरक्षा आणि गुणवत्ता मानकांची पूर्तता करतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
मोबाईल चार्जरवर लिहीलेला R कोड संकेत देतो की, तुम्ही खरेदी करत असलेला मोबाईल चार्जर रजिस्टर्ड आणि प्रमाणित आहे. ज्या मोबाईल चार्जरवर हा कोड लिहीलेला असेल तो सुरक्षा मानकांची पूर्तता करतो आणि खराब क्वालिटी ऑफर करत नाही. तर ज्या मोबाईल चार्जरवर हा कोड लिहीलेला नसेल किंवा चुकीचा लिहीलेला असेल तर सावध व्हा. कारण असे चार्जर खरेदी करणं तुमच्या स्मार्टफोनसाठी धोकादायक ठरू शकते. अशा चार्जरमुळे ब्लास्ट होण्याचा धोका देखील असतो.
जर तुम्हाला स्मार्टफोन चार्जर खरेदी करताना अधिक खात्री करून घ्यायची असेल तर तुम्ही लिहीलेला कोड ऑनलाईन देखील तपासू शकता. यासाठी BIS Care अॅप किंवा BIS च्या अधिकृत वेबसाईटचा वापर करू शकता. तुम्हाला केवळ चार्जरवर लिहीलेला कोड एंटर करावा लागणार आहे. यानंतर या कोडसंबंधित संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसू लागणार आहे. यामुळे तुम्हाला अगदी काही क्षणातच समजू शकेल की तुम्ही खरेदी केलेला चार्जर किंवा कोणतेही प्रोडक्ट असली आहे की नकली.
चार्जरवर लिहीलेला R कोड तपासणं म्हणजे तुमच्या स्मार्टफोनच्या सुरक्षेत वाढ करणं. कारण जर तुम्ही नकली चार्जर खरेदी केला तर तुमचा स्मार्टफोन लवकर खराब होण्याची शक्यता असते आणि तुम्हाला जास्तीचा खर्च करावा लागू शकतो. तसेच ओवरहीटिंग, शॉर्ट सर्किट किंवा करंट लागण्यासारख्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. मात्र ओरिजीनल चार्जर खरेदी केल्यास अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता फार कमी असते. तसेच तुमच्या स्मार्टफोनच्या सुरक्षेत देखील वाढणार आहे.






