फोटो सौजन्य - pinterest
WhatsApp आता लवकरच त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच करणार आहे. ज्यामुळे युजर्सचा फोटो आणि व्हिडीओ शेअरिंगचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. या नव्या फीचरमुळे युजर्सना जुने फोटो शेअर शोधण्यासाठी किंवा नवीन फोटो आणि व्हिडीओ शोधण्यासाठी जास्त वेळ वाया घालवावा लागणार नाही. नवीन किंवा जुने फोटो आणि व्हिडीओ युजर्ससाठी अगदी सहज उपलब्ध होणार आहेत. हे नवीन फीचर अपडेट WhatsApp बीटा अँड्रॉइड 2.24.16.5 वर उपलब्ध असेल.
हेदेखील वाचा- आता WhatsApp वर इंटरनेटशिवाय मोठ्या फाईल शेअर करता येणार! लवकरच लाँच होणार नवं फीचर
सध्या या नव्या फीचरची चाचणी केली जात आहे, त्यामुळे युजर्सना या नवीन फीचरसाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. अल्बम पिकर फीचर असं या नवीन अपडेटचं नाव आहे. Wabetainfo ने दिलेल्या माहितीनुसार, WhatsApp नवीन अल्बम पिकर फीचरची चाचणी करत आहे. यामध्ये यूजर्स एका अल्बममधून दुसऱ्या अल्बममध्ये सहजतेने जाऊ शकतील. सध्या यूजर्सना WhatsApp वर गॅलरी टॅबद्वारे अल्बम उघडण्याची सुविधा आहे. परंतु, अल्बम पिकर फीचर लाँच करण्यात आल्यानंतर, अल्बम टाइटल व्यूमध्येच एक सिलेक्टर ॲड-ऑन असेल. त्याच्या मदतीने, यूजर्स सहजपणे फोटो निवडण्यास सक्षम असतील.
हेदेखील वाचा- तुम्हालाही WhatsApp वर वाहतूक दंडाचा मॅसेज आलाय का? सावध राहा नाहीतर होईल लाखोंचं नुकसान
अल्बम पिकर फीचर सुरू झाल्यानंतर WhatsApp इंटरफेस आधुनिक होईल आणि यूजर्सना ॲप वापरणेही सोपे जाईल.WhatsApp च्या नवीन फीचरमध्ये युजरला अल्बमचा सारांश दिला जाईल. या फीचरनंतर युजरची वारंवार गॅलरी टॅबवर जाण्याच्या त्रासातून सुटका होईल. हे फीचर गॅलरी शीटला छान लुक देते. यामध्ये, अल्बमच्या टाइटलवर टॅप केल्यानंतर एक मिनिमलिस्ट विंडो दिसेल, ज्यामुळे नेव्हिगेशन सोपे होईल. या विंडोमध्ये, प्रत्येक अल्बममधील आयटमची संख्या दर्शविली जाईल, ज्यामुळे युजर्सला फोटो निवडणे सोपे होईल.
Wabetainfo नुसार, WhatsApp चे नवीन फीचर बीटा टेस्टर्सवर उपलब्ध असेल. गुगल प्ले स्टोअरवरून नवीन फीचर्स सहज अपडेट करता येईल. हे फीचर येत्या काही दिवसांत सर्व WhatsApp युजर्ससाठी आणले जाईल. या फीचर्सशिवाय WhatsApp फोटो शेअरिंगच्या नव्या फीचरवरही काम करत आहे. यामध्ये WhatsApp यूजर व्ह्यूइंग स्क्रीन पाहून उत्तर देऊ शकतील. याशिवाय मेटा AI च्या मदतीने फोटोही एडिट करता येतात. हे फीचर Android 2.23.20.20 पासून आढळले आहे.