फोटो सौजन्य - pinterest
WhatsApp आता लवकरच त्यांच्या युजर्ससाठी एक भन्नाट फिचर लाँच करणार आहे. ह्या नव्या फिचरमुळे युजर्सना मोठ्या प्रमाणत फायदा होणार आहे. आपल्याला WhatsApp वर कोणतीही फाईल शेअर करायची असेल तर इंटरनेट ची गरज असते. इंटरनेट शिवाय आपण WhatsApp वर कोणतीहि फाईल शेअर कर शकत नाही. आपण एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो आणि त्या इंटरनेट काम करत नसेल, तर अशावेळी आपण WhatsApp वर कोणतीही फाईल शेअर कर शकत नाही. त्यामुळे आपली अनेक कामं रखडतात. पण आता युजर्सच्या ह्याच समस्या लक्षात घेत WhatsApp लवकरच नवीन अपडेट घेऊन येणार आहे.
हेदेखील वाचा – हरवलेली वस्तू शोधण्यासाठी वापरा JioTag Air! काय आहे किंमत जाणून घ्या
ज्यामुळे युजर्स इंटरनेटशिवाय जवळच्या लोकांसोबत मोठ्या फाइल्स शेअर करू शकतील. म्हणजेच आता यूजर्सना इंटरनेटवर अवलंबून राहावे लागणार नाही. यासाठी आता WhatsApp एका फाईल शेअरिंग फीचरवर काम करत आहे. लवकरच हे फिचर लाँच केलं जाणार आहे. याबाबत WABetaInfo ने X वर पोस्ट करत माहिती दिली आहे. WABetaInfo ने X वर ह्या नव्या फिचरबाबत एक स्क्रीन शॉट शेअर केला आहे. WABetaInfo ने आपल्या रिपोर्टमध्ये या फीचरची माहिती दिली आहे.
WABetaInfo ने X वर सांगितलं आहे की, WhatsApp 24.15.10.70 iOS साठी बीटा मध्ये विकसित केले जात आहे. आयफोनवर भविष्यातील अपडेटमध्ये पीपल नियरबाय फीचर उपलब्ध होऊ शकते. WABetaInfo ने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये हे स्पष्टपणे दर्शविले आहे की फाइल iOS मेकॅनिझममध्ये शेअर करण्यासाठी QR कोड स्कॅन करावा लागेल. हे त्या संपर्क आणि WhatsApp खात्यांमधील फाइल शेअरिंग सुधारण्यात मदत करू शकते. ज्या भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी खूप कमी आहे अशा भागात हे फीचर खूप उपयुक्त ठरणार आहे आणि वापरकर्त्यांना दैनंदिन डेटा वाचवण्यासही मदत करेल.
हेदेखील वाचा – नायजेरियाने Meta ला ठोठावला 22 कोटी रुपयांचा दंड; नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई
सध्या WhatsApp चे हे फिचर विकासाच्या टप्प्यात आहे आणि लवकरच हे फिचर Android आणि iOS पर्यंतच्या प्लॅटफॉर्मवर लवकरच लाँच केले जाऊ शकतं. या फीचरची एक खास गोष्ट अशी आहे की यामध्ये तुम्हाला एंड-टू-एंड एन्क्रिप्शन दिले जाईल जेणेकरुन फक्त प्राप्तकर्ताच माहिती घेऊ शकेल. मात्र हे फीचर कधी रिलीज होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या नव्या फिचरमुळे आता यूजर्सना इंटरनेटवर अवलंबून राहावे लागणार नाही. यूजर्स इंटरनेटशिवाय जवळच्या लोकांसोबत मोठ्या फाइल्स शेअर करू शकतील. ज्या भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी खूप कमी आहे अशा भागात हे फीचर खूप उपयुक्त ठरणार आहे आणि वापरकर्त्यांना दैनंदिन डेटा वाचवण्यासही मदत करेल. हे फीचर युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.
WhatsApp युजर्स च्या सुरक्षिततेसाठी देखील लवकरच एक नवीन अपडेट घेऊन येणार आहे. वाढत्या फसवणुकीच्या घटना लक्षात घेत WhatsApp ने युजर्सच्या सुरक्षिततेसाठी नवीन फिचर लाँच करणार असल्याचं सांगितलं आहे. या नव्या फिचर्समुळे युजर्सची सुरक्षा अधिक वाढणार आहे. तसेच फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी देखील मदत होणार आहे.