Awe Dropping ईव्हेंटनंतर Apple पुन्हा करणार मोठा धमाका! वर्षाच्या अखेरीस लाँच होणार अनेक नवीन प्रोडक्ट्स, वाचा संपूर्ण यादी
टेक जायंट कंपनी एप्पलचा सर्वात मोठा इव्हेंट गेल्या आठवड्यात आयोजित करण्यात आला होता. या इव्हेंटमध्ये कंपनीने त्यांच्या आयफोन 17 सिरीजसोबत आणखी काही प्रोडक्ट्स देखील लाँच केले आहे. या इव्हेंटनंतर आता कंपनी पुन्हा एकदा एक नवा धमाका करणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत कंपनी काही नवीन प्रॉडक्ट लाँच करण्याचा विचार करत आहे. या आगामी प्रॉडक्ट्सबद्दल सोशल मीडियावर माहिती शेअर करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षात कंपनी सतत नवीन प्रॉडक्ट्स लाँच करण्यावर भर देत आहे. यंदा देखील कंपनीची हीच परंपरा कायम राहण्याची शक्यता आहे. कारण या वर्षाच्या सुरुवातीलाच कंपनीने त्यांचा स्वस्त फोन लाँच केला होता. त्यानंतर अलीकडेच आयोजित करण्यात आलेले इव्हेंटमध्ये कंपनीने त्यांच्या बहुप्रतीक्षित आयफोन 17 सिरीजसोबत अनेक नवीन प्रॉडक्ट देखील लाँच केले. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनी नेहमीच नवीन डिझाईन आणि अपग्रेड फीचर्ससह त्यांचे प्रोडक्ट्स लाँच करण्यावर भर देत असते. यामुळे युजर्सचा अनुभव अधिक चांगला व्हावा, अशी कंपनीची इच्छा असते. त्यामुळे लाँच करण्यात आलेले नवीन प्रोडक्ट्स त्यांच्या आधीच्या मॉडेलपेक्षा बरेच अपडेट असतात. अलीकडेच कंपनीने अनेक नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. ज्यामध्ये आयफोन 17 सिरीज, AirPods Pro 3 आणि इतर डिव्हाईसचा समावेश आहे. या लाँचिंगनंतर आता कंपनी लवकरच पुन्हा एकदा नवीन प्रोडक्ट्स लाँच करणार आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
Apple will reportedly launch these new products between late 2025 and early 2026 🔥
Source: @markgurman pic.twitter.com/Hrj2kziONe
— Apple Hub (@theapplehub) September 14, 2025
iPhone 17 नंतर आता Apple 2025 आणि 2026 च्या सुरुवातीला नवीन प्रोडक्ट्स लाँच करण्याची शक्यत आहे. यामध्ये iPad Pro, अपडेटेड Vision Pro, AirTag 2, Apple TV, HomePod mini यासह इतर प्रोडक्ट्सचा समावेश असणार आहे.
iPad Pro (M5 चिपसह) – हे प्रोडक्ट ऑक्टोबरपर्यंत लाँच केलं जाऊ शकते. यामध्ये पोर्ट्रेट मोड सेल्फी कॅमेरा देखील असणार आहे.
अपडेटेड Vision Pro – नवीन हेडबँड आणि फास्ट प्रोसेसरसह कंपनी अपडेटेड Vision Pro लाँच करणार आहे. तर Vision Pro 2 2027 पर्यंत लाँच होऊ शकते.
AirTag 2 – जास्त रेंज आणि चांगल्या ट्रैकिंग क्षमतेसह हे डिव्हाईस लाँच केले जाऊ शकते.
Apple TV (N1 चिपसह) – वेगवाने प्रोसेसर, नवीन Siri आणि Apple Intelligence फीचर्ससह हे डिव्हाईस लाँच केले जाऊ शकते.
HomePod mini (अपडेटेड) – नवीन कलर आणि स्पीडी चिपसह हे डिव्हाईस लाँच केले जाऊ शकते.
MacBook Pro (M5 चिप) – अशी शक्यता आहे की, कंपनी हे डिव्हाईस 2026 च्या सुरुवातीला लाँच करू शकते.
MacBook Air (M5 चिप) – 2026 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत हे डिव्हाईस लाँच होण्याची शक्यता आहे.
नवीन Mac External Monitor – या वर्षाच्या शेवटी किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला हे डिव्हाईस लाँच होण्याची शक्यता आहे.
iPhone 17e – A19 चिपसह, 2026 मध्ये लाँच होऊ शकते.
Smart Home Hub – Siri च्या पुढील पिढीसह, डिव्हाईस 2026 च्या सुरुवातीला लाँच होऊ शकते.