98-इंच डिस्प्लेसह Xiaomi TV S Pro Mini LED 2026 सीरीज लाँच, लाखोंच्या घरात आहे किंमत! जाणून घ्या फीचर्स
Xiaomi TV S Pro Mini LED 2026 अखेर लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा लेटेस्ट टिव्ही त्यांच्या नवीन Redmi K90 सीरीज स्मार्टफोनसह सादर केला आहे. Xiaomi च्या या लेटेस्ट स्मार्ट टिव्हीमध्ये 98-इंच 4K डिस्प्ले देण्यात आला आहे. हा टिव्ही XM9000 चिपसह लाँच करण्यात आला आहे. ज्याची पीक ब्राइटनेस 5,700 निट्स आहे. Xiaomi TV S Pro Mini LED 2026 मॉडेलला 3,864 डिमिंग जोनसह लाँच करण्यात आले आहे. हा Android टिव्ही HyperOS 3 वर आधारित आहे. स्मार्टटिव्ही, स्मार्टफोन सिरीज आणि स्मार्टवॉचसह Redmi Projector 4 Pro देखील लाँच करण्यात लाँच करण्यात आला आहे.
शाओमीच्या 98-इंचवाल्या Xiaomi TV S Pro Mini LED 2026 मॉडेलसह कंपनीने 55-इंच, 65-इंच, 75-इंच, आणि 85-इंच मॉडेल देखील लाँच केले आहे. Xiaomi TV S Pro Mini LED 2026 चा 98-इंच मॉडेल चीनमध्ये CNY 15,999 म्हणजेच सुमारे 1,94,000 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
Xiaomi TV S Pro Mini LED 2026 सीरीज 98-इंच 4K (2,160×3,840 पिक्सेल) डिस्प्लेसह लाँच करण्यात आली आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 5,700 निट्स आणि रिफ्रेश रेट 330Hz पर्यंत आहे. 4K कंटेंटदरम्यान या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 165Hz आहे. या मॉडेलचे बेजल 4.6mm आणि स्क्रीन ब्लॅक बॉर्डर 0.9mm आहे. टीव्हीच्या पाहण्याच्या कोनाबद्दल बोलायचे झाले तर ते 178-डिग्री आहे.
शाओमीचा हा टिव्ही वैरिएबल रिफ्रेश रेट (VRR) आणि FreeSync Premium Pro सर्टिफाइड आहे. पॅनलबद्दल बोलायचं झालं तर याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे, जो मोशन एस्टिमेशन एंड मोशन कॉम्पेनसेशन (MEMC) सपोर्टसह येतो. हा 95 परसेंट कवरेज आणि DCI-P3 कलर गौमटला सपोर्ट करतो. हा टिव्ही 3,864 हाय-रेजोल्यूशन बॅकलाइट जोन प्रीसाइज लाइट आणि शॅडो कंट्रोल करतो.
स्मार्ट टिव्हीमध्ये लाइट सेंसर आणि कलर टंप्रेचर सेंसर सपोर्ट देण्यात आला आहे, जो रियल टाइममध्ये डिटेक्टिंग एंबिएंट लाइट सपोर्ट करतो. यासोबतच यामध्ये डायनमिकली एडजेस्ट ब्राइटनेस आणि कलर टेंप्रेचर सपोर्ट देखील देण्यात आला आहे. Xiaomi TV S Pro Mini LED 2026 मध्ये कंपनीने XM9000 चिप दिली आहे. हा Android TV कंपनीच्या HyperOS 3 यूजर इंटरफेसवर आधारित आहे. हा टिव्ही 2.1.2-चॅनल स्पीकर (71W) सह Harman AudioEFX आणि Dolby Atmos वर चालतो.






