Year Ender big Accident: महाकुंभ चेंगराचेंगरी, मुंबई रेल्वे अपघात, अहमदाबाद प्लेन क्रॅश, आणि दहशतवादी हल्ल्यांसह अनेक भीषण घटनांनी देश हादरला. या अपघातांमध्ये अनेकांनी प्राण गमावले.
कुंभ मेळ्यामुळे रेल्वेला मोठा फायदा झाला आहे. महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने रेल्वेच्या पुणे विभागाला तब्बल ८.४२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १९ वा वर्धापन दिन सोहळा आज चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी बाळा नांदगावकर यांनी महाकुंभमधून आणलेल्या गंगेच्या पाण्यावरही भाष्य केलं.
आता हेच बघणं राहिलं होतं... ! नवऱ्याला कुंभस्नान घडावे म्हणून बायकोने नवऱ्याला व्हिडिओ केला आणि आपला मोबाईल फोनच पाण्यात बुडवला, पाहून युजर्स आवाक्. व्हिडिओ व्हायरल होताच लोक आता महिलेची तुलना…
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. लाखो भाविकांनी आतापर्यंत या कुंभमेळ्यात स्नान केलं असून अजून भाविक प्रयागराजमध्ये शाही स्नानासाठी दाखल होत आहेत.
प्रयागराजमध्ये गेल्या महिन्यापासून महाकुंभमेळा सुरू आहे. या महाकुंभमेळ्याला देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली आहे.
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याची २६ फेब्रुवारी रोजी सांगता होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत कुंभमेळ्याची मुदत आणखी वाढवली जाणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली.
उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. देशभरातील कोट्यवधी भाविक स्नान करण्यासाठी येत आहे. मात्र संगमाच्या ठिकाणी महिलांच्या गोपनीयतेबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यावर ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांनी वादग्रस्त विधाने केली होती. त्यावर आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीका केली आहे.
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. कोट्यवधी लोकांनी या संगमावर स्नान केले असून अजूनही भाविकांची संख्या वाढत आहे. मात्र महाकुंभमेळ्याचे पाणी अतिशय दुषित असल्याचे समोर आले आहे.
प्रयागराजमध्ये १४४ वर्षांनंतर महाकुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. कोट्यवधी भाविकांनी गंगेत स्नान केलं आहे. मात्र अलिकडे चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या असून काही भाविकांना यात प्राण गमवावे लागले आहेत.
महाकुंभामध्ये मिळालेल्या लोकप्रियतेनंतर मोनालिसा हिला एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांनी तिला चित्रपटाची ऑफर दिली आहे. एका प्रसिद्ध निर्मात्यांनी तिला फसवल्याचा आरोप दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्यावर केला आहे.
प्रयागराज येथे सनातन संस्कृतीचे भव्य दर्शन घडविणारा कुंभमेळा सुरू आहे. आस्थेचा असा भव्य संगम जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. मानवी संस्कृती आणि सभ्यतेमध्ये हजारो वर्षापासून हा संगम आपल्याला पाहायला मिळतो.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पत्नी अमृता फडणीस आणि मुलगी दिविजासह गंगेत स्नान करून महाकुंभ २०२५ मध्ये हजेरी लावली. अमृता फडणवीस यांनी आपले फोटो शेअर केले आहेत.
विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'छावा' हा चित्रपट उद्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. याचदरम्यान चित्रपटाच्या यशासाठी विकी कौशल आता प्रयागराज महाकुंभात हजेरी लावताना दिसला आहे.
26 फेब्रुवारीपर्यंत ही संख्या दुप्पट होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. रविवारी प्रयागराज येथून 330 रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या होत्या. तर सोमवारी 191 रेल्वेगाड्या विविध मार्गावर सोडण्यात आल्या.
महाकुंभ मेळ्यावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसचा मध्यप्रदेशातील जबलपूरमधील सिहोराजवळ भीषण अपघात झाला. भाविकांची बस एका ट्रकला धडकली. ज्यात ७ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे.