“हड, आताच कोरोना गेलाय”; नांदगावकरांनी आणलेल्या गंगेच्या पाण्यावर राज ठाकरे असं का म्हणाले?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १९ वा वर्धापन दिन सोहळा आज चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी बाळा नांदगावकर यांनी महाकुंभमधून आणलेल्या गंगेच्या पाण्यावरही भाष्य केलं. महाकुंभ मेळ्यात गेलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांचाही समाचार घेत श्रद्धा-अंधश्रद्धेतून बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे.
राज ठाकेर म्हणाले, बाळा नांदगावकर महाकुंभसाठी प्रयागराजला गेले होते. तिथून गंगेचं पाणी आणलं होतं. इकडे येऊ त्यांनी ते मला दिलं. मात्र मी म्हटलं हड, आताच कोरोना गेला आहे. गंगेच्या पाण्यात काय काय मिसळत असतं. कोट्यवधी भाविकांनी स्नान केलं. कपडे धुतले. शिवाय प्रदूषित पाणी सोडलं जातं. असं दूषित पाणी का प्यायचं. आपल्यातले काहीजण तिकडे गेले होते. तिकडे जायची आवश्यकता असते तर इतकी पाप करताच कशाला, असं म्हणत त्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांचे कान टोचले.
विदेशात जातो तेव्हा आपल्याला नदी किती स्वच्छ सुंदर दिसतात. त्यांच्याकडे नदीला माताही म्हटलं जात नाही. आपल्याकडे माता म्हटलं जातं. तरीही नद्यांची काय अवस्था आहे? असा संतप्त सवाल त्यांनी केला. तसंच आपल्याकडच्या नद्या इतक्या प्रदूषित आहेत. गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याची आश्वासन दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यापासून एकत आलो आहोत. मात्र अद्याप गंगा नदी साफ करण्यात आलेली नाही, उलट आणखी प्रदूषित झाल्याचं ते म्हणाले.
एक छोटीशी गोष्ट सांगतो, प्रभू रामचंद्रांचा जेव्हा वनवास झाला तेव्हा ते निघाले, त्यांच्याबरोबर लक्ष्मण, सीतामाई सगळ्यांना घेऊन गेला. नाशिकमध्ये आले. १४ वर्षांचा ववनास त्यांनी भोगला. मध्यंतरीच्या काळात रामचंद्रांच्या सीतेला पळवून घेऊन गेला. मग वाली आणि सुग्रीव भेटले. वालीचा वध केला. त्यानंतर वानरसेना बरोबर घेतली. सेतू बांधला श्रीलंकेत गेले, तिथे रावणाचा वध केला. या सगळ्या गोष्टी १४ वर्षात त्यांनी केल्या. आपण वांद्रे वरळी सी लिंक बांधायला १४ वर्षे घेतली आहेत.