महाकुंभ प्रयाग योग कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)
नागपूर: प्रयागराज येथे सनातन संस्कृतीचे भव्य दर्शन घडविणारा कुंभमेळा सुरू आहे. आस्थेचा असा भव्य संगम जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. मानवी संस्कृती आणि सभ्यतेमध्ये हजारो वर्षापासून हा संगम आपल्याला कुंभमेळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळतो. भाविक जात, भाषा, पंथ विसरून कुंभमेळ्यात एकत्रित येतात. त्यामुळे हा समाजाच्या एकतेचा योग असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शहरातील रेशीमबाग मैदानात आयोजित ‘महाकुंभ प्रयाग योग’ कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
50 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी आतापर्यंत कुंभमेळ्यात स्नान केले. ज्या भाविकांना कुंभमेळ्यात जाण्याचा योग आला नाही त्यांच्यासाठी प्रयागराज येथील संगमावरील जल नागपुरात आणण्यात आले आहे. यासाठी महाकुंभ प्रयाग योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
महाकुंभ प्रयाग योग
पुण्य आले दारी…🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'महाकुंभ प्रयाग योग' कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका 'महाकुंभ प्रयाग योग' कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति🕚 11.05am | 16-2-2025📍Reshimbagh, Nagpur | स. ११.०५ वा. |… pic.twitter.com/VJhvjfuhpM
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 16, 2025
आजवर कोट्यवधी भाविकांनी महाकुंभादरम्यान प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले आहे. पण ज्यांना तेथे जाणे शक्य नाही अशांनाही या पवित्र संगम जलाच्या स्नानाची अनुभूती व्हावी या अनुषंगाने प्रयागराज येथील जल रामटेकमार्गे नागपुरात आणण्यात आले होते. या अनुषंगाने ‘महाकुंभ प्रयाग योग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास द सत्संग फाउंडेशन, नागपूर केंद्राचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे, राजेश लोया, अमेय हेटे आदी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा: भगवी वस्त्र, भक्तीत लीन; गंगेचरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह पत्नी अमृता आणि मुलीची हजेरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाकुंभमध्ये केले स्नान
सध्या महाकुंभ २०२५ दरम्यान अनेक जण गंगा स्नान करण्यासाठी जातात. याचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासह दर्शन घेत गंगास्नान केले आणि पवित्र स्नानाचा लाभ घेतला. यावेळी सर्वाधिक लक्ष वेधलं ते म्हणजे त्यांची पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा यांनी. देवेंद्र फडणवीस हे भाजप या पक्षाचे आहेत आणि हिंदुत्वाचा रंग भगवा आहे हे लक्षात ठेवत दोघींनीही चिकनकारी पंजाबी ड्रेस घालून यावेळी सर्वांचे मन जिंकून घेतलं. कसा आहे दोघींचा लुक जाणून घेऊया.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी आणि मुलीसह विधीवत पूजाही केली आणि यावेळी त्यांनी पगडी परिधान केली होती तसंच पांढऱ्या रंगाचे उपरणेही गळ्यात घातल्याचे दिसून आले. तर पत्नी अमृता यांनी साधेपणा दर्शवत लाल रंगाचा पांढरी प्रिंट असणारा पंजाबी ड्रेस परिधान करत पूजा केल्याचे दिसून आले. हातात नारळ घेत त्यांनी मनोभावे पूजा केली. तर मुलगी दिविजाने हातात तांब्या धरत पांढऱ्या रंगाचा पंजाबी सूट परिधान करत सर्वांचे मन जिंकून घेतले. संपूर्ण पारंपरिक विधी पाळत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाने मन जिंकलेच तर त्यांच्या पेहरावाचीही चर्चा झाल्याचे दिसून आले आहे.