दिल्ली स्टेशनवरुन प्रयागराजला जाणारी गाडी पकडण्यासाठी गर्दी उसळली होती. त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाली. यानंतर स्टेशनवरील प्रवासी एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघाले. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली, ज्यात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 20 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. एका प्रत्यक्षदर्शीनं याबाबत बोलताना सांगितलं की, परिस्थिती घाणेरडी होती आणि लोक ट्रेनसमोर पडले. त्यांचे अक्षरशः तुकडे पडले, काही चिरडले गेले, काहीजण गुदमरले आणि मृत्यूमुखी पडले. या दुर्दैवी घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही एक्सवर पोस्ट करत मृतांना श्रद्धांजली दिली आहे.