नेपाळमध्ये राजकीय घडामोडीनंतर माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांनी अंतरिम पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी त्यांना शपथ दिली. त्यांच्या मंत्रिमंडळात सध्या कोणताही मंत्री नाही.
नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की असतील. त्यांचा आज रात्री राष्ट्रपती भवनात शपथविधी होईल. नेपाळमधील सत्तापालटानंतर ३ दिवसांनी लष्कर, राष्ट्रपती आणि जनरल-झेड नेत्यांच्या अनेक बैठकींनंतर हा निर्णय घेण्यात आला.
नेपाळच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की या अंतरिम पंतप्रधान होऊ शकतात. भ्रष्टाचाराविरुद्धच्या त्यांच्या कडक भूमिकेसाठी ओळखल्या जातात. महिलांच्या संवैधानिक समानतेच्या दिशेने त्यांची नियुक्ती ऐतिहासिक मानली जात होती.