नेपाळच्या अंतरिम मंत्रिमंडळाचा विस्तार सुरु; पंतप्रधान सुशीला कार्की यांनी 'या' ३ नेत्यांना केले समील (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Nepal Interim Goverment : काठमांडू : सध्या नेपाळमधील परिस्थिती हळूहळू सुरळीत होत चालली आहे. नेपाळचे माजी पंतप्रधान ओली शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर वातावरण स्थिरता निर्माण होत असून अंतिरम सरकारची स्थापना सुरु आहे. नेपाळच्या माजी महिल सर न्यायाधीशी सुशीला कार्की यांनी नेपाळच्या पहिला महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. दरम्यान त्यांना मंत्रीमंडळाच विस्तार केला करण्यास सुरुवात केली आहे. सध्या काळजीवाहू सरकारची स्थापना सुरु असून यामध्ये तीन नेत्यांना सामील करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये कुलमन घिसिंग, ओमप्रकाश अर्याल आणि रामेश्वर खनाल यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सोमवारी १५ सप्टेंबर रोजी त्यांनी शपथ घेतली असून त्यांच्याकडे महत्वाची पदे सोपवण्यात आली आहेत.
कोणत्या नेत्यांकडे कोणते पद सोपवण्यात आले?
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळच्या अंतरिम सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. यात तीन मंत्र्यांना सामीस करण्यात आले आहे.
सोमवारी (१५ सप्टेंबर) या तिन्ही मंत्र्यांनी राजधानी काठमांडूच्या राष्ट्रपती भवनात शीतल निवासमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
#WATCH | Nepal’s interim cabinet expands with the induction of three ministers. Visuals from ‘Sital Niwas’, the Nepali Rashtrapati Bhawan in Kathmandu.
Kulman Ghising, Om Prakash Aryal and Rameshwor Khanal took oath as Ministers this morning. pic.twitter.com/J2FO4lGRHb
— ANI (@ANI) September 15, 2025
कार्की यांनी पदाभार स्वीकारल्यानंतर हिंसाचारात जखमी झालेल्यांची भेट घेतली होती. यावेळी सुशीला कार्की यांनी हिंसाचारात बळी गेलेल्यांना शहीद म्हणून घोषित केले. तसेच पीडितांच्या कुटुंबियांना दहा लाख नेपाळी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली. या आंदोलनात ५१ लोकांचा बळी गेला असल्याची माहिती मिळाली आहे.
तसेच कार्की यांनी भ्रष्टाचार निर्मुलनावरही ठोस पाऊले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांनी सहा महिन्यात निवडणुका घेणार असल्याचे आणि त्यानंतर सत्ता सोडणार असल्याचे म्हटले आहे. १२ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी अंतरिम सरकारचा पदाभार स्वीकारल्यानंतर ५ मार्च २०२६ पूर्वी निवडणूका घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
नेपाळमध्ये अंतरिम मंत्रीमंडळात कोणाला सामील करण्यात आले?
मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये कुलमन घिसिंग, ओमप्रकाश अर्याल आणि रामेश्वर खनाल या तीन नेत्यांना अंतरिम मंत्रीमंडळात सामील करण्यात आले आहे.
नेपाळमध्ये का सुरु होते आंदोलन?
नेपाळमध्ये ओली सरकारच्या सोशल मीडियावरील बंदी, भ्रष्टाचार, आणि नेपोटिझ, बेरोजगारी विरोधात जनरेशन झेडने आंदोलन छेडले होते.
Nepal Politics: नेपाळच्या पंतप्रधान तर झाल्या पण…; सुशीला कार्कींसमोर असेल मोठ्या आव्हानांचा डोंगर