नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचाराचा भडका! Gen Z आणि UML च्या कार्यकत्यांमध्ये वाद, कर्फ्यू लागू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मीडिया रिपोर्टनुसार, नेपाळच्या बारा जिल्ह्यातील सिमरा विमानतळावर जनरेशन झेड आणि CPN-UML च्या कार्यकर्त्यांमध्ये चकामक झाली. गुरुवारी (२० नोव्हेंबर) झालेल्या या निदर्शनांना थांबवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. सध्या बारा सरकारने दुपारी १२.३० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत सिमरा विमानतळाजवळ ५०० मीटरच्या परिसरात कर्फ्यू लागू केला आहे.
जनरल झेड युवक आणि यूएमएल कार्यकर्त्यांमध्ये युवा जनजागृती मोहिम सुरु करण्यावरुन वाद हा वाद झाला आहे. युएमएल पक्ष ही मोहिम सुरु करण्याची तयार करत होता. पण यापूर्वीच जनरेशनल झेडच्या तरुणांनी सिमरा विमानतळावर CPN-UML चे सरचिटणीस शंकर पोखरेल आणि युवा नेते महेश बसनेट यांना घेऊन जाणाऱ्या विमानावर हल्ला केला. हे विमान दोन्ही नेत्यांना घेऊन काठमांडूहून आले होते. सिमरा येथे का सरकारविरोधी रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी दोन्ही नेते आहे. होते. पण त्यांचे सिमरामध्ये आगमन होताच जनरेशनल झेडच्या तरुणांना विमानतळार हल्ला केला.
जनरेशन झेड च्या या हल्ल्यामुळे बुद्ध एअरलाईन्सने काठमांडूहून सिमराला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द केली आहेत. सध्या परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जनरेशन झेडच्या तरुणांनी केलेल्या आरोपानंतर यूएमएलच्या दोन सदस्यांना अटक केली आहे. जितपूर सिमरा उपमहानगरपालिकेचे अध्यक्ष धन बहादूर आणि अध्यक्ष कैमुद्दीन यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या संघर्षात काही तरुण जखमी झाले होते. यानंतर तरुणांनी अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत यूएमएलच्या दोन सदस्यांना अटक केली.
नेपाळमध्ये दोन महिन्यांपर्वी सप्टेंबरमध्ये तीव्र आंदोलन (Nepal Violence) झाले होते. ८ सप्टेंबर रोजी ओली सरकारच्या सोशल मीडियावरील बंदीविरोधात हे आंदोलन भडकले होते. या आंदोलनाने हिंसक रुप घेतले होते. यावेळी नेपाळचे ओली शर्मा यांचे सरकारला पाडण्यात आले. यामुळे देशात मोठ्या प्रमाणाच अस्थिरता पसरली होती. अनेक ठिकाणी जाळफोळ, तोडफोड झाली होती.
सध्या नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाले असून पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की (Sushila Karki) यांची निवड करण्यात आली आहे. याच अतंरिम सरकारच्या नेतृत्त्वाखाली आता नेपाळमध्ये पारदर्श पद्धतीने निवडणुका घेण्याची तयारी सुरु केली आहे. १२
KP Oli Sharma : हिंसाचारानंतर पहिल्यांदाच नेपाळमध्ये दिसले केपी ओली; केले अनेक धक्कादायक खुलासे
Ans: जनरल झेड युवक आणि यूएमएल कार्यकर्त्यांमध्ये युवा जनजागृती मोहिम सुरु करण्यावरुन वाद हा वाद झाला आहे.युएमएल पक्ष ही मोहिम सुरु करण्याची तयार करत होता. पण तरुणांनी याला विरोध केला आहे.
Ans: नेपाळमध्ये नुकत्याच घडलेल्या आंदोलनात काही तरुण जखमी झाले आहेत, पण कोणाच्याही मृत्यूची नोंद झालेली नही.






