यवतमाळमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीच्या प्रियकराची हत्या केली. लाकडी दांड्याने मारहाण करून त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपी अटकेत असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
यवतमाळजवळ वणी-घुग्गुस मार्गावर कार शिकवताना भीषण अपघात; वडील रियाजुद्दीन शेख आणि तिन्ही मुलींचा मृत्यू, भावाची मुलगी गंभीर. मायराचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला धडक, कारचा चुराडा.
एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपाताची गोळी घेतल्यानंतर मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलीवर बलात्कार करणाऱ्या शिकवणी शिक्षकाला अटक केली असून डॉक्टरचीही चौकशी करत आहे.
तसेच खर्चासाठी दहा रूपयांची मागणी केली. तेव्हा तिने आपल्याकडे पैसे नसल्याचे त्याला सांगितले. त्यावर संतप्त झालेल्या नातवाने तिच्यावर लाकडी काठीने हल्ला चढविला.
शेंगा तोडल्याच्या रागातून धाकट्या भावाने मोठ्या भावावरच वेळवाच्या काठीने प्रहार केला. त्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळून मृत्युमुखी पडला.