यवतमाळमधून भीषण अपघाताची धक्कदायक बातमी समोर आली आहे. या अपघातात वडिलांसह तीन बहिणींचा जागीच मृत्यू झाला आहे. वडील मुलीला वणी – घुग्गुस मार्गावर कार शिकवित होते. त्यादरम्यान झालेल्या अपघातात वडिलांसह तिन्ही बहिणींचा मृत्यू झाला आहे. यात एक मुलगी गंभीर जखमी आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव रियाजुद्दीन रफिउद्दीन शेख (५२) असे आहे तर मायरा रियाजुद्दीन शेख (१७), जोया रियाजोद्दीन शेख (१२), अनिबा रियाजोद्दीन शेख (१०) असे मृत्यू झालेल्या तिन्ही मुलींचे नाव आहे.
Mumbai Airport: मुंबई विमानतळावर मोठी कारवाई: DRI कडून 47 कोटींचं कोकेन जप्त, पाच जण अटकेत!
कसा झाला अपघात?
समोर आलेल्या माहितीनुसार, रियाजुद्दीन शेख त्यांची १७ वर्षीय मुलगी मायराला कार शिकवीत होते. मागच्या सीटवर त्यांच्या दोन मुली आणि भावाची मुलगी बसली होती. घुग्गुस मार्गाने वणीकडे येताना मायरा कार चालवित होती. यावेळी जन्नत हॉलजवळ मायराचे कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार दुभाजकाला आदळली. स्पीड जास्त असल्याने कार दुभाजकाला एवढ्या जोरात आढळली की कार थेट उसळली आणि विरुद्ध लेनवर आढळली. यादरम्यान त्या लेनवरून जाणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. ट्रकचा स्पीड जास्त असल्याने ही धडक पण भीषण होती. आणि यात कारचा अक्षरश: चुराडा झाला. नागरिकांनी जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे. मात्र रियाजुद्दीन यांच्यासह त्यांच्या तिन्ही मुलींचा या अपघातात मृत्यू झाला. तर रियाज यांच्या भावाची पाच वर्षांची मुलगी इनाथा शारीख शेख गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर नागपूरमधील रुग्णलयात उपचार सुरु आहे.
साई भक्तांवर काळाचा घाला! फॉर्च्युनर तीनदा पलटी, भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू
नाशिकच्या येवल्यातून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. सुरतेहून शिर्डीकडे निघालेल्या साई भक्तांवर काळाने घाला घातला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात घडला आहे. यात गाडीने चक्क तीन पलट्या घेतल्या असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना नाशिकच्या येवला तालुक्यातील एरंडगाव – रायते शिवारात हि दुर्दैवी घटना घडली आहे.
Accident Breaking: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनरची तीन गाड्यांना धडक अन्…






