उमेदवार अमोल बालवडकर(फोटो-सोशल मीडिया)
Pune Municipal Corporation Election : येत्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा पारंपरिक पॅटर्न बदलताना दिसत असून, “निवडणूक आता जनतेने हातात घेतली आहे. मी मतदारांच्या भेटीला जातोच, पण आता अनेक ठिकाणी मतदार स्वतःहून माझ्या भेटीसाठी पुढे येत आहेत. ही निवडणूक केवळ प्रचाराची नाही; हा विश्वासाचा जनआंदोलनासारखा प्रवास आहे,” अशी भावना उमेदवार अमोल बालवडकर यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : “हे सगळं काय आहे भाऊ..? Vaibhav Suryavanshi चा धुमाकूळ पाहून रविचंद्रन अश्विनही झाला अवाक
गेल्या काही दिवसांत विविध परिसरांत नागरिक, सोसायटी प्रतिनिधी, युवक-युवती, महिला मंडळे, व्यापारी संघटना आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने स्वतःहून भेटीला येत आहेत. “मी एखाद्या ठिकाणी पोहोचण्याआधीच नागरिक जमा झालेले असतात. अनेकजण फोन करून ‘आम्हीच येतो, भेटायचं आहे’ असं म्हणतात. ही ऊर्जा शब्दांत सांगता येणार नाही,” असे बालवडकर म्हणाले.
सातत्याने 11 वर्ष जनतेची केलेली सेवा हेच याचे एकमेव कारण आहे, जनतेची ही काम करणाऱ्या माणसाला साथ हेच लोकशाहीचं खरं रूप आहे,” असे सांगत त्यांनी नागरिकांच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
हेही वाचा : ‘बुमराहच्या प्रोत्साहनामुळे दुखापतीतून…’, भारताच्या अष्टपैलू श्रेयंका पाटीलने केला मोठा खुलासा
यावेळी त्यांनी पुढे नमूद केले की, “ही साथ म्हणजे माझ्यावरचा वैयक्तिक सन्मान नाही; हा प्रभागाच्या भविष्यासाठीचा जनादेश आहे. लोकांना काम हवं आहे आणि मी विकास करणार माणूस. मी प्रत्येक भेटीत एकच शब्द देतो: संवाद, पारदर्शकता आणि काम.”






