हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी (फोटो- ani)
1. हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर
2. ढगफुटीमुळे अनेक गाड्यांचे मोठे नुकसान
3. हिमाचल प्रदेश सरकारने केंद्राकडे मागितली मदत
Kinnaur Heavy Rain Cloudburst: हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. किन्नोरमध्ये ढगफुटी झाली आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेकडो गाड्या वाहून गेल्या आहेत. अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. किन्नोरमध्ये निसर्गाचा प्रकोप झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास थांच गावात तीन नद्यांची पातळी वाढली. त्यामुळे हजारो नागरिक प्रभावित झाले आहेत.
अचानक आलेल्या जोरदार पाण्याच्या प्रवाहात नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. शेकडो गाड्या वाहून गेल्या आहेत. अचानक आलेल्या या स्थितीमुळे नागरिकांनी जंगलाच्या दिशेने जाऊन आपला जीव वाचवला. आलेला पुराचा वेग इतका वेगवान होता की, अनेक लोकांनी सुरक्षित स्थिकणी आश्रय घेतला.
सिमलामध्ये मोठे नुकसान
गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. देशभरात पावसाचा जोर कायम आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला येथे देखील मोठे नुकसान झाले आहे. शहरात वाहतुकीवर परिणाम झाला आहे. करेवथी गावात एक तीन मजली इमारत कोसळली आहे. त्या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये या वर्षी झालेल्या पावसामुळे 424 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे रस्ते आणि अन्य गोष्टींवर परिणाम झाला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. अनेक लोकांचा आपला प्राण गमवावा लागला आहे.
India Heavy Rain Alert: आज जरा जपूनच! ‘या’ राज्यांवर वरूणराजा कोपणार; IMD चा अलर्ट वाचून म्हणाल…
आज हवामान विभागाने हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर जम्मू काश्मीर, पूर्वेकडील राज्यात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोंकण, पुणे, विदर्भ व मराठवाडा भागात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आज मान्सून साधारण असण्याची शक्यता आहे. वातावरण ढगाळ राहील व हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.