उत्तराखंडमध्ये ढगफूटी (फोटो- istockphoto)
उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर वाढला
उत्तरकाशीत ढगफुटी
देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुरस्थिती
Uttarkashi Cloudburst: उत्तराखंडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथे ढगफुटी झाली आहे. उत्तरकाशी येथील नौगांव येथे ढगफूटी झाली आहे. ढगफुटी झाल्याने या ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. वाहून आलेल्या ढीगाऱ्यात एक निवासी इमारत गाडली गेली आहे. त्यामुळे या ढीगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकले असण्याची शक्यता आहे.
सहा पेक्षा जास्त इमारती पाण्यात बुडाल्या आहेत. देवलसारी परिसरात एक मिक्सर मशीन आणि काही दुचाकी देखील वाहून गेल्याचे समजते आहे. एक चार चाकी देखील बुडाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला आहे. याआधी नौगांव येथील नदी इशारा पातळीवरून वाहत असल्याची सूचना देण्यात आली होती.
उत्तरकाशी जिले के नौगांव क्षेत्र के देवलसारी इलाके में बादल फटने की सूचना है।#UttarkashiCloudBurst#Naugaon#Uttarakhand pic.twitter.com/FgY4w0njAk
— Uttarakhand DIPR (@DIPR_UK) September 6, 2025
नदी दुथडी भरून वाहत असल्याने अनेक घरे आणि दुकानात पाणी शिरले होते. दरम्यान उत्तराखंडच्या काही जिल्ह्यात भुस्खलन होण्याची शक्यता आहे. रुद्रप्रयाग जिल्हा हा संवेदनशील समजला जात आहे. उत्तराखंडमध्ये नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. तर येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
पुढील काही दिवस उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आजपासून 9 तारखेपर्यंत उत्तराखंड व हिमाचल प्रदेशमध्ये अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. पंजाबमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. पुरस्थिती पंजाबमध्ये अजूनही कायम आहे.
एसडीआरएफ, एनडीआरएफ, पोलिस, लष्कर आणि अन्य आपत्कालीन पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. नाल्याच्या पूरामुळे परिसरात आणखी नुकसान झाले असून, सर्वात आधी घटनास्थळी पोहोचलेले लष्कराचे जवान मदतकार्य करत आहेत.सध्या पूर्ण परिसरात मदतकार्यात अडथळे येत असून हवामानही साथ देत नाही. मात्र सर्व यंत्रणा याठिकाणी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. परिसरात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी आणि मदत पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
पावसाचा मोर्चा ‘या’ राज्यांकडे वळला
आज देशभरात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पूर्वेकडील राज्यात आणि दक्षिण भारतात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासाह पाऊस होण्याचा अंदाज आहे. भारतीय हवमान विभागाने बिहार, झारखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
IMD Rain Alert: आज सगळीकडे दाणादाण! पावसाचा मोर्चा ‘या’ राज्यांकडे वळला; अलर्ट वाचून म्हणाल…
गुजरात राज्याला देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नर्मदा नदी दुथडी भरून वाहत आहे. सरदार सरोवर धरणातून साडेचार लाख क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील दोन दिवसांत गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.