पंजाबमधील पुरावर शाहरुख खानची प्रतिक्रिया (Photo Credit- X)
Punjab Flood: पंजाबमधील पुरामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. जवळपास अर्धे राज्य सध्या पुराच्या तडाख्यात असून लाखो लोक बाधित झाले आहेत. या कठीण काळात अनेक चित्रपट तारे मदतीसाठी पुढे येत आहेत. अनेक कलाकारांनी परिस्थितीवर दुःख व्यक्त केले आहे. बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खान यानेही पंजाबमधील पुराबाबत सोशल मीडिया अकाऊंट ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे.
शाहरुख खानने ‘एक्स’ वर लिहिले, “पंजाबमधील या विनाशकारी पुरामुळे बाधित झालेल्या लोकांसाठी माझ्या संवेदना आहेत. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. पंजाबचे धैर्य कधीही तुटणार नाही… देव सर्वांचे रक्षण करो.”
My heart goes out to those in Punjab impacted by these devastating floods. Sending prayers and strength… The spirit of Punjab shall never break… may God bless them all.
— Shah Rukh Khan (@iamsrk) September 3, 2025
पंजाबमध्ये पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे संपूर्ण देश दुःखी आहे. अनेक चित्रपट कलाकार प्रत्यक्ष लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. करीना कपूर खाननेही पंजाबच्या परिस्थितीबद्दल ट्विट केले. ती लिहिते, “उत्तर भारतात जे लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करते. आशा आहे की लवकरच बाधित लोकांपर्यंत मदत पोहोचेल आणि त्यांना शक्ती मिळेल.” करीना म्हणाली की, जे लोक मदत करू शकतात त्यांनी नक्कीच मदत करावी आणि स्थानिक लोकांमार्फत मदत पोहोचवावी.
विकी कौशलनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, अनेक गावे पुराच्या तडाख्यात असून लोक संघर्ष करत आहेत. त्याने बाधित लोकांसाठी प्रार्थना केली आहे. तसेच, जे लोक गावात जाऊन लोकांना मदत करत आहेत, त्यांना सलामही केला आहे.
दरम्यान, गायक आणि अभिनेता एमी विर्क स्वतः पंजाबमधील पूरग्रस्त भागात बचावकार्यासाठी उतरले होते आणि त्यांनी पाण्यात अडकलेल्या लोकांना मदत केली. दुसरीकडे, दिलजीत दोसांझने 10 गावे दत्तक घेतली आहेत. याव्यतिरिक्त, मिका सिंगची टीमही पंजाबमध्ये सक्रिय असून ती लोकांना मदत पोहोचवण्यासोबतच बचावकार्यातही सहभागी आहे.
सध्या पंजाबमधील 23 जिल्हे पुरामुळे गंभीरपणे बाधित झाले आहेत. या पुरामध्ये आतापर्यंत 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. 1998 नंतरचा हा सर्वात भीषण पूर मानला जात आहे. राज्यात सतत पाऊस पडत असल्याने परिस्थिती आणखी खराब होत आहे. प्रशासन मदत आणि बचाव कार्याला वेग देत आहे. राज्यात 7 सप्टेंबरपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.