Photo Credit- Social Media एअर मार्शल ए.के भारतींचा पाकिस्तानला खुला इशारा
India-Pakistan Conflict: आमची लढाई दहशतवादाविरोधात होती, त्यामुळे आम्ही ७ मेला दहशतवादी ठिकाणांवरच हल्ला केला, पण पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांची साथ देणं उचित समजलं आणि ही लढाई ती स्वत:वर घेतली. त्यामुळे या लढाईत जे नुकसान झाले त्यासाठी तेच जबाबदार आहेत. अशी माहिती एअर मार्शल भारती यांनी माहिती दिली. इतकेच नव्हे तर, राष्ट्रकवि रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेतील “याचना नहीं अब रण होगा…जीवन जय या मरण होगा” या ओळी गात त्यांनी पाकिस्तानला खुला इशाराच दिला आहे. भारत-पाकिस्तानातील युद्धविरामानंतर आयोजित तीनही सैन्यदलांच्या पत्रकार परिषदेत
डीजी एअर ऑपरेशन्स, एअर मार्शल ए. के. भारती यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात शत्रूच्या धोकादायक क्षेत्रांमध्ये तोंड देताना जे काही निष्कर्ष मिळाले, त्यातील काही आता स्क्रीनवर दाखवले जात आहेत. पीएल-15 हे चिनी बनावटीचे क्षेपणास्त्र आपल्या लक्ष्यावर अचूक लागले नाही. याचे तुकडे आमच्याकडे उपलब्ध असून ते पाहता येतील.
भारतीय दलांना आणखी एक शस्त्र सापडले आहे – लांब पल्ल्याचे रॉकेट्स. लोइटर युद्ध सामग्री आणि मानवरहित हवाई प्रणाली (UAVs) याबद्दल आपण याआधी चर्चा केली आहे. हे सर्व शस्त्रास्त्र आमच्या प्रशिक्षित पथकांनी आणि हवाई संरक्षण प्रणालीद्वारे निष्प्रभ करण्यात आले आहेत. भारताने पाडलेले तुर्की बनावटीचे YIHA आणि सोंगर ड्रोन यांचे अवशेष देखील सादर करण्यात आले आहेत.
एअर मार्शल ए. के. भारती यांनी पुढे सांगितले की, “आपली युद्ध-सिद्ध प्रणाली वेळेच्या कसोटीवर खरी उतरली असून ती प्रभावीपणे काम करत आहे. विशेष म्हणजे, स्वदेशी आकाश वायु संरक्षण प्रणालीने अत्युत्तम कामगिरी बजावली आहे. शक्तिशाली एअर डिफेन्स (AD) वातावरण निर्माण करणे आणि त्याचे प्रभावी संचालन करणे हे गेल्या दशकात भारत सरकारकडून मिळालेल्या आर्थिक आणि धोरणात्मक पाठबळामुळे शक्य झाले आहे. पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेल्या ड्रोन आणि मानवरहित लढाऊ हवाई यानांच्या अनेक लाटांनाही स्वदेशी विकसित सॉफ्ट आणि हार्ड किल काउंटर-यूएएस प्रणाली आणि प्रशिक्षित भारतीय हवाई संरक्षण पथकांनी यशस्वीरीत्या निकामी केले.”
DGMO राजीव घई म्हणाले की, गेल्या काही वर्षांत दहशतवादी कारवायांचे स्वरूप बदलले आहे. सैनिकांसोबतच आता दहशतवाद्यांकडून निष्पाप नागरिकांवर हल्ले होऊ लागले आहेत. पहलगामच्या हल्ल्यापर्यंत दशहतवादाचा पापाचा घडा भरला आहे. 2024मध्ये शिवखोरी मंदिराकडे जाणारे यात्रेकरूंवर झालेला हल्ला हा या ट्रेंडचा भाग आहे. पहलगाममध्ये झालेला हल्ला त्याच्या पापाचा घडा होता. ऑपरेशन सिंदूरची कृती आपल्याला एका संदर्भात समजून घेण्याची गरज आहे. आम्ही ही संपूर्ण कारवाई नियंत्रण रेषा न ओलांडताच केली, त्यामुळे शत्रू काय करेल याची आम्हाला पूर्ण कल्पना होती, त्यामुळे आमचे हवाई संरक्षण पूर्णपणे तयार होते.
India Pakistan Tension : भारत-पाक तणाव निवळला, ३२ विमानतळं
भारतीय लष्कराचे डीजीएमओ (डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी भारतीय लष्कराची ताकद स्पष्ट केली. त्यांनी स्वतःला विराट कोहली यांचा मोठा चाहता असल्याचे सांगत आणि 1970 च्या दशकातील एशेज मालिकेतील एका प्रसंगाचा उल्लेख केला.
लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, “आपल्या एअरफील्ड्स आणि लॉजिस्टिक्सना लक्ष्य करणे अत्यंत अवघड आहे… मी पाहिले की विराट कोहली यांनी नुकतेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली . ते माझ्या आवडत्या खेळाडूंमध्ये एक आहेत. 1970 च्या दशकात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील एशेज मालिकेदरम्यान, दोन ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज — डेनिस लिली आणि जेफ थॉमसन — यांनी इंग्लंडच्या फलंदाजीचा धुव्वा उडवला होता. त्याचवेळी ऑस्ट्रेलियात एक वाक्य प्रसिद्ध झाले: ‘Ashes to Ashes, Dust to Dust, if Thommo don’t get ya, Lillee must.’”