कॉँग्रेस आमदाराचे वादग्रस्त विधान (फोटो- सोशल मीडिया)
कर्नाटक कोंग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान
महिला पत्रकाराच्या प्रश्नावर दिले विचित्र उत्तर
भाजपकडून जोरदार टीका
Congress MLA RV Deshpande: कर्नाटकमध्ये कॉँग्रेसने एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. कॉँग्रेसच्या आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे आता त्यांच्यासह कॉँग्रेसपक्षावर टीकेची झोड उठली आहे. कर्नाटकमधील कॉँग्रेस आमदार अडचणीत आले आहेत. महिला पत्रकाराने रुग्णालयाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर बोलताना या नेत्याने महिला पत्रकाराच्या प्रसुतीबाबत वादग्रस्त विधान केले आहे. या नेत्याचे नाव आरवी देशपांडे असे आहे.
नेमके प्रकरण काय?
हे संपूर्ण प्रकरण कर्नाटकमधील असल्याचे समोर आले आहे. एका महिला पत्रकाराने आमदार आरवी देशपांडे यांना जोईदा तालुक्यातील रुग्णालय कधीपर्यंत पूर्ण होईल असा प्रश्न विचारला. कारण ते अजून तयार झाले नसल्याने स्थानिक लोकांना विशेषतः गर्भवती स्त्रियांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आमदार आरवी देशपांडे यांचे उत्तर काय?
महिला पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार देशपांडे यांनी “काळजी करू नका तुमची प्रसूती आम्ही योग्य वेळेत करून देऊ”, असे उत्तर दिले. तेव्हा महिला पत्रकाराने त्यांना काय म्हणालात साहेब असा प्रश्न केला. त्यावर बोलताना देशपांडे म्हणाले, “तुमच्या प्रसुतीची वेळ आली की आम्ही ते करून देऊ”, असे उत्तर दिले. यावर महिला पत्रकाराने ही माझी वैयक्तिक गरज नसून, परिसरातील लोकांची गरज आहे असे उत्तर दिले.
पत्रकाराने केली माफीची मागणी
आमदार आरवी देशपांडे यांच्या विधानाने धक्काच बसल्याचे त्या महिला पत्रकाराने सांगितले. “मी त्यांना असे कधीही बोलताना ऐकले नाही. मी आणि माझ्या वृत्तवाहिनीने त्यांना माफी मागण्यास सांगितले आहे. मात्र अजून त्यांच्याकडून काही उत्तर आलेले नाही”, असे या महिला पत्रकाराने सांगितले.
भाजपची टीका
दरम्यान कॉँग्रेस आमदार आरवी देशपांडे यांच्या वादग्रस्त विधानावर भाजपने जोरदार टीका केली आहे. अशा प्रकारच्या विधानातून कॉँग्रेसची महिलांबाबतची नीच मानसिकता दिसून येते, अशी टीका भाजपने टीका केली आहे.
पंतप्रधान झाले भावूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बिहारमधील महिलांसाठी राज्य जीविका निधी क्रेडिट कोऑपरेटिव्ह युनियन लिमिटेडची सुरुवात केली. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या उपक्रमाची सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि राजदवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या व्यासपाठीवरून झालेल्या शिवीगाळीचा उल्लेख केला. आईचा उल्लेख होताच ते भावूक झाले.