भारतात असे अनेक अध्यात्मिक गुरु झालेत, ज्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले. मात्र, असे असूनदेखील त्यांच्याकडे कोटींची संपत्ती पाहायला मिळते. यातीलच एक वादग्रस्थ नाव म्हणजे ओशो.
कोरेगाव पार्क भागातील ओशो आश्रमाच्या गेटवर बेकायदेशीररित्या जमाव जमवत आश्रमाच्या मॅनेजमेंटविरोधात घोषणाबाजी करून आश्रमात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी सुमारे सव्वाशे अनुयायांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात ओशो यांच्या आश्रमात दोन गटात बुधवारी झालेल्या वादानं ओशो आश्रम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आश्रम व्यवस्थापन आणि ओशोंचे अनुयायी असा हा वाद चांगलाच रंगलाय.
"ओशो यांचा जन्म व मृत्यचे स्थळ, समाधी भारतात आहे. त्यांनी सर्वाधिक काळ भारतात घालवला. मात्र ओशोंची बौद्धिक संपदा, पुस्तके, ध्वनिफिती, दृकश्राव्य फिती, ट्रस्टची मालमत्ता या सर्वांचे मान्यता अधिकार मात्र पाश्चिमात्यांकडे…