दोन वर्षातच तिप्पट नफा ! क्विक कॉमर्स साइट्स छापताय तगडा पैसा
हल्ली जेव्हापासून डिजिटलायझेशची क्रांती भारतात झाली आहे, तेव्हापासून कोणतीही गोष्ट कुठेही आणि कोणत्याही वेळी सहज उपलब्ध होत आहे. पूर्वी एखादी वस्तू ऑनलाईन मागवताना किमान एक तीन ते चार दिवसांचा वेळ लागायचा. पण आज क्विक कॉमर्स सर्व्हिसमुळे एखादी गोष्ट काही मिनिटातच सहज उपलब्ध होताना दिसते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वीगी इंस्टामार्ट, ब्लिंकिंट, इत्यादी.
या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्समुळे अनेक भारतीयांना घराबाहेर न पडता सहजरित्या आपल्या आवडत्या गोष्टी ऑर्डर करता येतात. आता मोठ्या शहरांमध्ये फक्त भाजीपाला आणि दूधच नाही, कपडे, मेकअप आणि अगदी आयफोन 10-30 मिनिटांत पोहोचवले जात आहेत. अवघ्या अर्ध्या तासात डिलिव्हरी होत असल्यामुळे याला क्विक कॉमर्स असे नाव देण्यात आले आहे. ही सुविधा 18-35 वयोगटातील तरुणांना खूप आवडते, त्यामुळे गेल्या दोन वर्षांत क्विक कॉमर्सचा व्यवसाय तीन पटीने वाढला आहे.
भारताच्या आसपासही नाही अमेरिका, चीन, जपान; शेअरबाजारातील भांडवल वाढीत देशाने मिळवले अग्रस्थान
डॉटम रिसर्चनुसार, 2022 मध्ये भारतातील क्विक कॉमर्सचा व्यवसाय दोन अब्ज डॉलर्सचा होता, जो 2024 मध्ये $6.1 अब्ज इतका वाढेल. 2030 पर्यंत क्विक कॉमर्सचा व्यवसाय $40 अब्जपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. यामुळेच अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या क्विक कॉमर्सच्या व्यवसायात आपला हात आजमावणार हे नक्की आहे. काही देशांमध्ये त्यांनी क्विक कॉमर्स सुद्धा केल्या आहेत.
प्रामुख्याने स्टायलिश कपडे विकणाऱ्या Myntra ने अलीकडेच क्विक कॉमर्स लाँच केले आहे, जे 10-30 मिनिटांत कपडे आणि फॅशन ॲक्सेसरीज उपलब्ध करून देईल. मात्र, झटपट व्यापार वाढल्याने छोट्या किराणा व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) पासून फेडरेशन ऑफ रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया पर्यंत, त्यांनी क्विक कॉमर्सच्या वाढत्या व्याप्तीबद्दल आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.
सोन्याप्रमाणेच आता चांदीवरही हॉलमार्किंगची तयारी ; फक्त ‘या’ कारणामुळे होतेय अडचण
विविध अहवालांनुसार, 2022 मध्ये क्विक कॉमर्सच्या वापरकर्त्यांची संख्या 54 लाख होती, जी यावर्षी 2.6 कोटी झाली आहे. 2060 पर्यंत, क्विक कॉमर्सच्या वापरकर्त्यांची संख्या 6 कोटी होईल अशी अपेक्षा आहे. झेप्टो, झोमॅटो, ब्लिंकिट, स्विगी यांसारख्या कंपन्या क्विक कॉमर्समध्ये वेगाने पुढे येत आहेत.
चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत, ब्लिंकिटच्या व्यवसायात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत याच कालावधीत 122 टक्के वाढ नोंदवली गेली. डॉटमच्या संशोधन अहवालानुसार, क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खरेदी करणाऱ्या 69 टक्के ग्राहकांना 10 मिनिटांच्या आत त्यांच्या वस्तूंची डिलिव्हरी हवी असते. 31 टक्के ग्राहकांना डिलिव्हरीची घाई नाही. इतर मेट्रो शहरांपेक्षा मुंबई आणि बेंगळुरूमध्ये क्विक कॉमर्सचा कल अधिक आहे. क्विक कॉमर्सची डिलिव्हरी महाग असली तरी तरुणांवर याचा परिणाम होत नाही, त्यामुळेच ऑर्डर्सची संख्या सातत्याने वाढत आहे.