एसटी बसचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होणार (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई: राज्यातील प्रवाशांचा एसटीमधील प्रवास सुखकर व्हावा म्हणून राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भविष्यात प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या स्मार्ट एसटी बसेस राज्य सरकार खरेदी करणार आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
एसटी विभागाने नुकत्याच 3 हजार नवीन एसटी बसेसची खरेदी केली आहे. नवीन एसटी बसेस आणि आधीच्या बसेसमध्ये देखील एआय टेक्नॉलॉजी आधारित कॅमेरे, जीपीएस तंत्रज्ञान, एलईडी , वायफाय, बस लॉक सिटीम अशी अनेक तंत्रज्ञान एसटी बसमध्ये लावले जाणार आहे. त्यामुळे या एसटी बसेस प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल असे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.
स्वारगेट अत्याचार प्रकरणांतर सरकार सतर्क झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सरकारने महत्व दिले आहे. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. बस ड्रायव्हरवर देखील तिसरा डोळा लक्ष ठेवून असणार आहे. बसस्थानके आणि अन्य ठिकाणी देखील उभ्या असलेल्या बसमध्ये लॉक सिस्टिम लावण्यात येणार आहे.
एसटी बसेसमध्ये सध्या तापमान वाढल्याने आग लागण्याच्या घटना मोठा प्रमाणात घडत आहेत. यामुळे प्रत्येक बसमध्ये फोम बेस आग प्रतिबंधक यंत्रणा देखील लावण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या कालावधीत एसटी बस या संरत आणि प्रवाशांसाठी सुरक्षित होणारआहेत.
पुणे पोलिसांकडून ८९३ पानांचे दोषारोपपत्र
स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणाचा तपास ५२ दिवसात पुर्णकरून पुणे पोलिसांनी तब्बल ८९३ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. तांत्रिक गोष्टींवर अत्यंत चांगल्या पद्धतीने हा तपास पुर्ण केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, हा खटला फास्ट ट्रॅकवर चालविला जाणार असून, तिही प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे प्रयत्न पोलिसांचे आहेत.
Swargate Crime News: पुणे पोलिसांकडून ८९३ पानांचे आरोप; स्वारगेट बलात्कार प्रकरणात दोषारोपपत्र दाखल
स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारी रोजी गावी निघालेल्या २६ वर्षीय तरुणीवर (वय ३७, रा. गुनाट, ता. शिरूर) याने पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. गावी जाण्यास आलेल्या तरुणीला गाडेने ताई म्हणून संवाद साधत तिचा विश्वास संपादन केला. नंतर तिला वाहक असल्याचे सांगत तिला मुक्कामी गाडीत बसण्यास भाग पाडले. तिच्यावर दोनवेळा लैंगिक अत्याचार केला होता. बलात्काराच्या घटनेनंतर गाडे फरार झाला होता.