स्वारगेट एसटी स्थानकातील घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेसाठी एसटी महामंडळात आयपीएस दर्जाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. बसस्थानकांवरील सुरक्षा वाढवण्यासाठी सीसीटीव्ही संख्येत वाढ.
स्वारगेटचा परिसर आणि बसस्थानक कायमच धोकादायक असल्याचे आतापर्यंत झालेल्या एकूण घटना आणि केलेल्या पाहणीतून दिसून आले आहे. कारण, सातत्याने या परिसरात लुटमार, मोबाईल हिसकावणे, चोऱ्या अशा घटना घडतात.