महाराष्ट्रामध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून यामुळे सर्वांची अक्षरशः लाही लाही झाली आहे (फोटो - istock)
पुणे : यावर्षीचा उन्हाळा अत्यंत कडक ठरत आहे. या आठवड्यात तापमान हे 40 अंश सेल्सियसच्या वर पोहोचले आहे. ज्यामुळे नागरिकांची दैनंदिन जीवनशैली प्रभावित झाली आहे. तापमानाची वाढ आणि उन्हाचा तीव्रतेमुळे नागरिकांना खूप त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघात आणि इतर उन्हाळ्याच्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अति उष्णतेमुळे शरीराला जास्त थकवा, डिहायड्रेशन आणि उष्माघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवसभरात नियमितपणे पाणी पिणे, इलेक्ट्रोलाइट्स असलेले पदार्थ खाणे आणि थंड जागी विश्रांती घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लोकांना घराबाहेर जाताना छत्री, टोपी किंवा रुमाल वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. बाहेर जाण्यापूर्वी हलके व आरामदायक कपडे घालणे आणि सूर्याच्या तीव्रतेपासून बचाव करणे आवश्यक आहे. तसेच, ट्राफिक जाम आणि उष्णतेमुळे गर्दीच्या सार्वजनिक भागात सेवांमध्ये अडचणी येत आहेत. काही भागात वीज जात असतानाही नागरिकांना अडचणी येत आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणे जिल्ह्यात तापमानाच्या वाढीमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. उष्णतेमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना सध्या त्यांचे पिक वाचवण्यासाठी अधिक काळजी घ्यावी लागेल. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आणि आपली सुरक्षा सुनिश्चित करणे महत्वाचे आहे.
माजी सैनिक चंद्रकांत मेंगावडे याबाबत म्हणाले की, “दरवर्षी पेक्षा या वर्षी तापमान सर्वाधिक आहे. लहान मुले वृद्ध नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडू नये. ग्रामीण भागत जनावरे पालन मोठ्या प्रमाणात केले जाते, शेतकऱ्यांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत असून उन्हाळ्यात कलिंगडाला मागणी वाढली आहे. कलिंगडाचे दर आटोक्यात असल्याने सर्व स्तरातील ग्राहक कलिंगड खाण्यास पसंती देत असुन खाणाऱ्यांच्या जीवाला गारवा मिळत आहेत. आंबेगाव तालुका हा बागायत तालुका असून दर उन्हाळ्यात तालुक्यातील अनेक शेतकरी कलिंगड पिकाचे उत्पादन घेत असतात. सध्या कलिंगडास गुणवत्तेनुसार व आकारानुसार १० ते १२ रुपये किलो दर मिळत असून अनेक व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतातच कलिंगड खरेदी करत आहे. गावागावात, मुख्य रस्त्यांच्या बाजूला अनेक छोटे मोठे व्यापारी कलिंगडाच्या विक्रीचे स्टॉल लावले असून ३० ते ६० रुपयांपर्यंत दराने कलिंगड विक्री करत आहेत. उन्हाचा तडाखा वाढल्याने पुणे, मुंबई, येथिल बाजारात कलिंगडास मागणी वाढली आहे. आंबेगाव तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी कलिंगडाचे चांगले उत्पादन घेतले असून अनेक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे.
नैसर्गिक थंड पाण्याचा स्रोत असलेल्या माठांची मागणी लक्षणीयरित्या वाढली असताना उन्हाळ्याच्या झळा वाढल्याने माठ विक्रीत वाढ झाली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) परिसरात सध्या नैसर्गिक पद्धतीने पाणी थंड करणारे माठ विक्रीला आले असून पर्यावरणपूरक व आरोग्यास पोषक अशा माठातून मिळणारे थंड पाणी हे केवळ शारीरिक ताजे पणासाठीच नव्हे तर उष्माघात टाळण्यासाठीही उपयुक्त मानले जाते. आधुनिक फ्रीजच्या काळात माठ वापरणाऱ्यांची संख्या काहीशी कमी झाली असली तरी गेल्या काही वर्षांत बॅक टू बेसिक्स या संकल्पनेमुळे माठाची मागणी वाढली आहे. शहरीकरणाच्या वाढत्या लाटेत पारंपरिक गोष्टींना दूर ठेवले जात असले तरी माठ अशी वस्तू आहे. जो आजही काळाच्या कसोटीवर उतरत असून उन्हाळ्यात नागरिकांनी पुन्हा एकदा माठाचा थंडावा अनुभवायला सुरुवात केल्याने बाजारात माठांची विक्री दिवसेंदिवस वाढत आहे.