दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊंज ठेपली आहे. हा सण भारतातील सर्वात मोठा सण मानला जातो. या सणानिमित्त आजूबाजूला दिवे आणि दिव्यांचे लखलखीत सुंदर तेजमय दृश्य पाहायला मिळते. संपूर्ण देशभरात हा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो.
भारताच्या प्रत्येक भागात दिव्यांचा हा सण मोठ्या साजरा केला जातो, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तो केवळ भारतातच नाही तर जगातील इतर अनेक देशांमध्येही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भारताव्यतिरिक्त नेपाळ, मलेशिया, थायलंड, श्रीलंका, अमेरिका आणि जपान या देशांमध्येही दिवाळी वेगवेगळ्या स्वरूपात साजरी केली जाते. चला जाणून घेऊयात या देशांमध्ये दिवाळी कशी साजरी केली जाते.
हेदेखील वाचा – Divorse Temple: वर्षानुवर्षे बायकांना मुक्ती देत आहे हे मंदिर, कोर्टाऐवजी इथेच होतो निर्णय
नेपाळ
नेपाळमध्ये दिवाळीला तिहाड़ म्हणून ओळखले जाते. हा पाच दिवसांचा उत्सव आहे, ज्यामध्ये प्रत्येक दिवसाचे स्वतःचे असे महत्त्व आहे. पहिल्या दिवशी गायींची, दुसऱ्या दिवशी कुत्र्यांची पूजा, तिसऱ्या दिवशी मिठाई तयार करून देवदेवतांची पूजा केली जाते, चौथ्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते आणि पाचव्या दिवशी भाऊ बीज साजरी केली जातो. नेपाळमध्ये, दिवाळीचा सण भारताप्रमाणेच थाटामाटात साजरा केला जातो.
मलेशिया
मलेशियामध्ये दिवाळीला हिरवी दिवाळी म्हणून ओळखले जाते. या दिवशी लोक लवकर उठतात, स्नान करतात आणि देवी-देवतांची पूजा करतात. मलेशियामध्ये दिवाळीच्या दिवशी निरनिराळ्या मेळ्यांचे आयोजन केले जाते, जेथे लोक खरेदी करतात आणि विविध प्रकारच्या पदार्थांचा आनंद घेतात.
हेदेखील वाचा – वंदे भारत ट्रेनमध्ये ‘वेटिंग तिकीट’ने प्रवास करता येतो का? काय आहेत नियम? सविस्तर जाणून घ्या
थायलंड
श्रीलंकेतील दिवाळीचा सण रामायणाशी जोडलेला आहे. या दिवशी लोक आपापल्या घरात मातीचे दिवे लावतात आणि एकमेकांच्या घरी जातात. श्रीलंकेत देखील दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
जपान
जपानमध्ये दिवाळीच्या दिवशी लोक त्यांच्या बागांमध्ये झाडांवर कागदाचे कंदील आणि पडदे टांगून साजरा करतात. यानंतर हे कंदील आकाशात सोडले जातात. या दिवशी लोक नाचतात, गातात आणि सणाची मजा लुटतात. जपानमध्ये दिवाळीचा सण खूप सुंदर असतो.
अमेरिका
अमेरिकेत राहणारे भारतीय समुदाय मोठ्या थाटामाटात दिवाळी हा सण साजरा करतात. येथे दिवाळीच्या दिवशी भारतीय मंदिरांमध्ये विशेष पूजा केल्या जातात आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. लोक एकत्र येऊन या सणाची मजा लुटतात.
टीप – ही माहिती केवळ वाचनाकरिता देण्यात आली आहे. कोणताही दावा आम्ही करत नाही. संकेतस्थळांवरून अभ्यास करून मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती असून वाचकांच्या ज्ञानात अधिक भर घालण्याचा हा प्रयत्न आहे.