कर्जत स्टेशनच्या लॉकअपचे गज कापून पाच वर्षांपूर्वी पळालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (दि. 13) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अक्षय राऊत आणि चंद्रकांत राऊत असे आहे. या दोन्ही आरोपींना २०१८साली हसन उमर शेख यांच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. परंतु ते लॉकअपचे गज कापून पळाले होते.
Mumbai Crime : मुंबईत ८१ वर्षीय महिला ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात; ८.७० कोटी गमावले, नेमकं काय घडलं?
नेमकं काय प्रकरण?
याबाबत अधिकची माहिती अशी की, २०१८ साली जुलैमहिन्यात टरबूज व्यापारी हसन उमर शेख (50, रा.मुंबई) यांची मोहन कुंडलिक भोरे व त्याच्या चार साथीदारांनी हत्या केली. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले अक्षय रामदास राऊत (28), चंद्रकांत महादेव राऊत (30, दोन्ही रा. पारवाडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) व त्यांचे 3 साथीदार अशा पाच आरोपींनी १० फेब्रुवारी २०२० रोजी कर्जत पोलीस स्टेशनच्या लोकउपचा छताचे लोखंडी गज तोडून, छतावरील कौले काढून पळाले होते.
याच गुन्ह्यातील आरोपी ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे, मोहन पुंडलिक भोरे, गंगाधर लक्ष्मण जगताप यांना अटक करण्यात आली होती. उर्वरीत आरोपी अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत पसार झाले होते. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना पसार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार हृदय घोडके, बाळासाहेब नागरगोजे, सागर ससाणे, रोहित येमुल, प्रशांत राठोड, अरुण मोरे यांच्या विशेष पथकाने बुधवारी (दि.13) मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचा शोध घेत अक्षय राऊत, चंद्रकांत राऊत यांना पुणे जिल्ह्यातील फुलगाव एमआयडीसी येथून ताब्यात घेतले. दोघांना कर्जत पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास कर्जत पोलीस करीत आहेत.
पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी
पुण्यात काही दिवसांपूर्वी शहरातील वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्याचा व्हिडीओ समोर आला होता. वाहतूक विभागाच्या कर्मचार्यांने कॅब चालकाला मारहाण केली होती. याचा व्हिडीओ समोर आला होता. आता पुणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने थेट मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर संबंधित पोलीस उपनिरीक्षकासोबत असलेल्या मित्राने मेडिकल चालकाच्या विरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूकडून एकमेकांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.
हि संपूर्ण घटना पुणे शहरातील नारायण पेठेत १३ ऑगस्ट रोजी घडली. तसेच ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. विजय सरवार असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते चंदननगर पोलीस स्टेशन येथे परिविक्षाधीन (प्रोबेशनल) पोलीस उपनिरीक्षक म्हणून नेमणुकीस आहेत.विश्रामबाग पोलीस ठाण्यात याबाबत मेडिकल चालक महादेव चोरे यांनी फिर्याद दिली आहे.