१२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बजाज चौक उड्डाणपुलाचं काम पूर्णत्वास आल्यानंतर, खासदार अमर काळे यांनी या पुलाचं उद्घाटन कोणत्याही राजकीय नेत्याने करू नये, अशी भूमिका घेतली आहे. ज्या सामान्य जनतेने १२ वर्षे त्रास सहन केला, त्यांच्याच हस्ते या पुलाचं उद्घाटन व्हावं, अशी मागणी करत काळे यांनी आपण स्वतः या उद्घाटनाला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट केलं. “राजकीय नेत्यांना या पुलाच्या उद्घाटनाचा नैतिक अधिकार नाही,” असं काळे यांनी म्हटलं आहे.