विधानसभा निवडणुकीसाठी भरलेले अर्ज घेण्याची मुदत संपल्यानंतर आता राजकीय पक्षाचे उमेदवार निश्चित झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला दणक्यात सुरुवात केली आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासूनच प्रचाराला प्रारंभ केला आहे. आता मात्र पठारेंच्या प्रचाराला वेग आला आहे. ताई आहे का घरातं, तुतारी आलीया दारातं, अशा प्रकारची गाणी गात घरोघरी पठारेंचा प्रचार सुरू आहे.