काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेला भ्याड हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झालाय त्या भ्याड हल्ल्याचा सर्व थरातून निषेध नोंदवण्यात येत आहे. या घटनेनंतर परतण्यासाठी विमाने ट्रेन मध्ये गर्दी वाढल्याने महाराष्ट्रातील पर्यटक कश्मीर परिसरात अडकले होते. या पर्यटकांना आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गटाची टीम कश्मीरमध्ये दाखल झाली होती .आत्तापर्यंत या टीमने सहाशेहून अधिक पर्यटकांना काश्मीर मधून महाराष्ट्रात परत आणले असल्याची माहिती राजेश मोरे यांनी दिली उर्वरित 170 पर्यटकांना आज महाराष्ट्रात परत आणण्यात येणार आहे .काश्मीर परिसरात अडकलेल्या पर्यटकांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्याची जबाबदारी आमची आहे जोपर्यंत शेवटचा पर्यटक महाराष्ट्रात परतत नाही तोपर्यंत शिवसेनेचे टीम ही काश्मीरमध्येच राहणार असल्याचे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितलं आहे.