राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवशरण पुजारी यांनी पत्रकार परिषद घेऊन ओव्हरलोड वाहनांच्या विरोधात आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी काही दिवसांपूर्वी केलेल्या आंदोलनानंतर विजय चौगुले यांचे नाव सांगून एका व्यक्तिने धमकी देखील दिली होती. याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस तपास सुरु आहे. आता मुंबई परिवहन कार्यालयाबाहेर ओव्हरलोड वाहनांविरोधात आमरण उपोषण करणार असल्याची प्रतिक्रिया शिवशरण पुजारी यांनी व्यक्त केली आहे. तर सदर विषय विरोधीपक्षनेत्या मार्फत अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी यांनी सांगितले.