राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य वैफल्यग्रस्त अवस्थेतील असून, मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीला शोभा देणारे नाही. शरद पवार यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरेचे संपवून टाकण्याचे आलेले वक्तव्य दंगली घडविण्यासाठी असल्याचा थेट आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. नगर येथे माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीला असे वक्तव्य शोभा देत नाहीत. राजकारणात मतभेद असू शकतात पण भावनेच्या भरात आपण काय बोलतो याचे भानही उद्धव ठाकरे यांना राहू नये याचे आश्चर्य वाटते. राज्यात मणिपूरचा संदर्भ देऊन जेष्ठ नेते शरद पवार यांनी केलेले वक्तव्य आणि आता उद्धव ठाकरे यांची भाषा राज्यात दंगली घडविण्यासाठी आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (कंटेट – गिरीष रासकर)