मोबाईलच्या आणि विशेषता सोशल मीडियाच्या काळामध्ये लहान लहान मुलांच्या हातात मोबाईल पडलेला असतो. या मोबाईलच्या मायाजालात अडकलेल्या लहान लहान मुलांसह तरुण पिढीला बाहेर काढून त्यांच्या हातात वेगवेगळ्या विषयावरील पुस्तके देण्याचे काम सांगलीतील “सांगली बुकीज ” वाचन चळवळीतील ग्रुप ग्रुपच्या माध्यमातून सुरू आहे. प्राध्यापक सुदर्शन चोरगे यांच्या पुढाकारातून सांगलीतील आमराई मध्ये दर रविवारी एकत्र येऊन आपापल्या आवडीची पुस्तके वाचली जातात. महात्मा फुले यांचे गुलामगिरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंगांचे मी नास्तिक का झालो, सॉक्रेटिस यासारखी शेकडो पुस्तके तरुण पिढीकडून आणि लहान लहान मुलांकडून वाचली जात आहेत.